हवालदार सुरेश पाटील लाच घेताना जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 मार्च 2018

हुपरी - गुन्ह्यातील अटकपूर्व कारवाई टाळण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील पोलिस ठाण्यातील हवालदार सुरेश बापू पाटील (रा. कणेरी ता. करवीर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. पोलिस ठाण्याच्या आवारातच रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही कारवाई झाली.

हुपरीचे सहायक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी आपल्या आगळ्या कार्यशैलीने हुपरी पोलिस ठाण्याचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सुरू केले असतानाच झालेल्या कारवाईने पोलिस ठाण्यातील खाबुगिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

यळगूड येथील कृष्णात दिवटे यांच्यावर मारामारीप्रकरणी हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. गुन्ह्यात अटकेची कारवाई टाळायची असेल तर सात हजार रुपयांची लाच देण्याची मागणी हवालदार सुरेश पाटील याने दिवटे यांच्याकडे केली होती. चर्चेअंती चार हजार रुपयांवर सौदा ठरला. या प्रकरणी दिवटे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला असता ठाण्यातच चार हजार रुपये स्वीकारताना सुरेश पाटील रंगेहाथ सापडला. 

पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रवीण पाटील, सहायक फौजदार शाम बुचडे, शरद कोरे, संदीप पासलेकर, रूपेश पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Kolhapur News Havaladar Suresh Patil gets caught in a bribe

टॅग्स