मुख्याध्यापकांचा विश्‍वास सार्थ ठरवणार...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 डिसेंबर 2017

कोल्हापूर - मुख्याध्यापक संघांच्या निवडणुकीत मतदारांनी जो विश्‍वास दाखविला, तो सार्थ ठरविण्याचे काम नूतन पदाधिकारी आणि संचालक मंडळ नजीकच्या काळात करेल. मुख्याध्यापक संघांचा नावलौकिक वाढविण्याचे काम निश्‍चितपणे आमच्या हातून होईल, असा विश्‍वास मुख्याध्यापक संघाचे अघ्यक्ष सुरेश संकपाळ व सचिव दत्ता पाटील यांनी 
व्यक्त केला.

दादा लाड यांच्या नेतृत्वाखालील समविचारी पॅनेलने मुख्याध्यापक संघाची सत्ता दीर्घ काळानंतर काबीज केली आहे. पुढील तीन वर्षे कामकाजाची पद्धत कशी, असेल यासंबंधी अध्यक्ष व सचिवांनी भूमिका मांडली.

कोल्हापूर - मुख्याध्यापक संघांच्या निवडणुकीत मतदारांनी जो विश्‍वास दाखविला, तो सार्थ ठरविण्याचे काम नूतन पदाधिकारी आणि संचालक मंडळ नजीकच्या काळात करेल. मुख्याध्यापक संघांचा नावलौकिक वाढविण्याचे काम निश्‍चितपणे आमच्या हातून होईल, असा विश्‍वास मुख्याध्यापक संघाचे अघ्यक्ष सुरेश संकपाळ व सचिव दत्ता पाटील यांनी 
व्यक्त केला.

दादा लाड यांच्या नेतृत्वाखालील समविचारी पॅनेलने मुख्याध्यापक संघाची सत्ता दीर्घ काळानंतर काबीज केली आहे. पुढील तीन वर्षे कामकाजाची पद्धत कशी, असेल यासंबंधी अध्यक्ष व सचिवांनी भूमिका मांडली.

या निवडणुकीत सभासद मतदारांनी फार मोठी जबाबदारी आमच्यावर टाकली आहे. 

मुख्याध्यापकांसह शिक्षण क्षेत्रासमोर जी आव्हाने उभी आहेत त्याचा मुकाबला केला जाईल. राज्य शासनाने खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे, ती पूर्णपणे चुकीची आहे. यातून बहुजनांचे शिक्षण संपून जाईल. त्याविरोधात जानेवारीत मुख्याध्यापक संघाच्या वतीने आंदोलन उभारले जाईल. आजच्या काळात मुख्याध्यापक अपडेट असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने पावले उचलली जातील. मुख्याध्यापकांच्या पदाधिकाऱ्यांकडून काय अपेक्षा आहेत, यासाठी स्वतंत्र रजिस्ट्रर ठेवले जाईल. त्यातून आम्ही कुठे कमी पडतो, याची माहिती मिळेल. नजीकच्या काळात संघाचा आर्थिक स्त्रोत वाढविणे गरजेचे आहे. पूर्वी एखाद्या नेत्याची शाळा असली की वसुली व्हायची नाही. आता अशी स्थिती असणार नाही. पाचवी ते दहावीपर्यंत घटक चाचणी, सहामाही, वार्षिक प्रश्‍नपत्रिकेचा विचार होईल. पूर्वी कागदासाठी निविदा भरली की त्यातील दर वेगळे असायचे आणि कमिटीला वेगळा दर दाखवला जायचा. 

प्रश्‍नपत्रिकेचा कागद हा दर्जेदार असायला हवा यासाठी आग्रह राहिल. कोल्हापूरचे कार्यक्षेत्र ओलांडून कोकण आणि पुणे विभागात पोचण्याचा प्रयत्न असेल.  

मुख्याध्यापक संघाच्या मुख्य इमारतीत मुलांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न राहील. संभाजीनगर येथे मुलींचे वसतिगृह आहे, त्याचे सध्याचे नियोजन ढिसाळ आहे. त्यात तातडीने सुधारणा केल्या जातील.
मुख्याध्यापकांना अशैक्षणिक कामे लावली जातात. त्यास नजीकच्या काळात विरोध केला जाईल. शालेय पोषण आहाराचा हिशेब ठेवणे हे काही मुख्याध्यापकांचे काम नाही. पाचवी ते बारावीपर्यंतच्या नव्वद टक्के शाळा खासगी व्यवस्थापनाच्या हाती आहेत. वेतनेतर अनुदान बंद असल्याने खडू फळ्याचा खर्चही वर्गणी काढून करावा लागतो. त्या विरोधात आवाज उठवावा लागेल. 

सत्तारूढ गटाने या निवडणुकीत आम्हाला कवडीमोल समजण्याचा प्रयत्न केला. संघाची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा होती; मात्र दोन जागांवर जागा देणार नाही, असे सांगण्यात आले. आम्हाला कमी लेखले गेले; मात्र सभासद मतदार सूज्ञ होते. त्यांनी या निवडणुकीत ठराविक जणांची मक्तेदारी संपुष्टात आणली. यापुढे मुख्याध्यापक संघ, शैक्षणिक व्यासपीठ संयुक्तपणे काम करेल. नूतन पदाधिकारी आणि संचालक मंडळाला कुणाचाही व्यक्तीद्वेष नाही. जे जे चांगले आहे, ते निश्‍चितपणे करण्याचा आमचा प्रयत्न करेल.

आश्‍वासने पाळणार
मुख्याध्यापक संघही इंटरनेट ॲप सुविधा, डिजिटल प्रिंटिंग प्रेस, विद्यार्थ्यांच्या बक्षीस रकमेत वाढ, अन्यायकारक अध्यादेशाविरोधात आंदोलन, एनएमएसएस शिष्यवृत्ती परीक्षा, एनटीएस परीक्षा सराव पेपर, तंटामुक्त शाळा अशी जाहीरनाम्यात वचने दिली आहेत, ती निश्‍चितपणे पूर्ण केली जातील.

Web Title: kolhapur news headmaster organisation election