ग्रामीण लोकांचे होणार हेल्थ कार्ड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - असंसर्ग रोगाचे निदान लवकर व्हावे व त्यावर वेळेत उपचार सुरू व्हावेत. यासाठी आरोग्य विभागातर्फे गावावागांत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ही जबाबदारी आशा स्वयंसेवकांवर सोपविण्यात येणार आहे. त्यामुळे हृदयविकार, कर्करोग, मधुमेहासारखे आजार लवकर समजण्यास मदत होणार आहे. त्यासाठी लवकरच आशांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

अभियान जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जर प्रामाणिकपणे राबविली तर ग्रामीण भागातील नागरिकांचे हेल्थ कार्ड तयार होण्यास मदत होईल. शासनाच्या असो अथवा महापालिका किंवा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग असो एखादा साथीचा रोग पसरला की यंत्रणा खडबडून जागी होती. सर्वेक्षणाचा आदेश निघतो. संसर्गजन्य आजाराचे रुग्ण शोधण्यासाठीही आरोग्य विभागाचे सर्वेक्षण केले जाते, मात्र यावेळी शासनाच्या आरोग्य विभागाने प्रथमच असंसर्ग रोगाचे निदान लवकर व्हावे, यासाठी ग्रामीण भागात सर्वेक्षणाचा निर्णय घेतला. या सर्वेक्षणामुळे हृदयरोग, दमा, कर्करोग, मधुमेहासारखे आजार लवकर समजणार आहेत. 

पहिल्या टप्प्यात आरोग्याधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांनी आपापल्या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावयाचे आहे. विशेषत: आशा कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येईल. आशांमार्फत ग्रामीण भागात घरोघरी जाऊन असंसर्ग रोगाची माहिती संकलित होणार आहे. हे करताना त्यांना कार्ड देण्यात येईल. ग्रामीण भागात अजूनही आरोग्यासंदर्भात जागरुकता झालेली नाही. त्यामुळे मधुमेहासारखे आजार शेवटच्या टप्प्यात त्यांच्या लक्षात येतात. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. हे टाळण्यासाठी शासनाने हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

असंसर्ग रोगांसाठी प्रथमच ग्रामीण भागात सर्वेक्षण होत आहे. ग्रामीण भागातील लोकांना मधुमेह किंवा हृदय विकारासारखे आजार लवकर समजू शकतील. शिवाय या सर्वेक्षणामुळे ग्रामीण लोकांचे हेल्थ कार्ड तयार हाईल.’’
  - डॉ. उषादेवी कुंभार, 

     प्रभारी जिल्हा आरोग्याधिकारी

Web Title: Kolhapur News Health card for Rural People