चव्हाणवाडीच्या तलावात तासाभरात १० फूट पाणी

अशोक तोरस्कर
सोमवार, 4 जून 2018

उत्तूर - चव्हाणवाडीत (ता. आजरा) शनिवारी (ता. २) दुपारी झालेल्या ढगफुटीमुळे ७० शेतकऱ्यांचे शेताचे बांध फुटून पेरलेले भात बियाणे वाहून गेले. यात आठ ते दहा लाखांचे नुकसान झाले.

उत्तूर - चव्हाणवाडीत (ता. आजरा) शनिवारी (ता. २) दुपारी झालेल्या ढगफुटीमुळे ७० शेतकऱ्यांचे शेताचे बांध फुटून पेरलेले भात बियाणे वाहून गेले. यात आठ ते दहा लाखांचे नुकसान झाले.

दरम्यान, गावाचा पाझर तलाव मेमध्ये कोरडा होता. मात्र, या तासाभराच्या पावसाने पाझर तलावातील पाण्याची पातळी दहा फुटांनी वाढली; तर पाणी योजनेचा जॅकवेल पूर्ण भरला.

 

गावात एकूण २८१ हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली आहे. यातील पाच हेक्‍टर क्षेत्र बागायत असून, बाकी सर्व क्षेत्र जिरायत आहे. यापैकी १२५ हेक्‍टर क्षेत्रावर भात पीक घेतले जाते. यासाठी बहुतांश शेतकरी धूळवाफ पेरणी करतात. पंधरा दिवसांपूर्वी या परिसरात चांगला पाऊस झाला. यामुळे ८० टक्के शेतकऱ्यांनी भात पेरणी केली. काही शेतकऱ्यांच्या शेतातील उगवणही वर आली आहे. मात्र, काल दुपारी या परिसरात जोरदार पाऊस झाला. ढगफुटीसारखा एकाच ठिकाणी पाऊस झाल्याने पेरलेल्या शेताच्या वाफ्यामध्ये पाणीच पाणी झाले. वाफे तुडुंब भरल्याने जुने दगडामातीचे बांध फुटून पेरलेले भात बियाणे वाहून गेले.

गेल्या पन्नास वर्षांत असा पाऊस झाल्याचे आठवत नाही. या पावसामुळे दुबार पेरणी करावी लागणार आहे. नवीन बियाणे खरेदी करण्याची शेतकऱ्यांची ऐपत नाही. यामुळे सरकारने बियाणे पुरविण्याची गरज आहे.
- तुकाराम गोरे,
शेतकरी

Web Title: Kolhapur News Heavy rains in Chavanwadi in Ajara Taluka