दोरीच्या आधाराने पार केला ओढा

अजित माद्याळे
मंगळवार, 5 जून 2018

गडहिंग्लज - कडगाव (ता. गडहिंग्लज) येथे सोमवारी (ता. 4) सायंकाळी ढगफूटीसदृश्‍य पाऊस झाला. यामुळे विठ्ठलाई मंदिराजवळच्या ओढ्याला मोठे पाणी आले. सुमारे तासभर झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. ओढा प्रवाहीत झाल्याने शेतकरी व नागरिकांना ये - जा करणे अडचणीचे झाले.

सुमारे तासभर आेढ्याच्या दुसऱ्या बाजुला ताटकळत राहावे लागल्याने शेतकरीही त्रस्त झाले. शेवटी एका शेतकऱ्याने शक्कल लढवून आेढ्याच्या दुसऱ्या बाजूस उभ्या असणाऱ्या मुलांना दोरी आणण्यास सांगितले. ही दोरी बोअरवेलला बांधून त्या दोरीचा आधार घेत खांद्यावर पेरणीची कुरी घेवूनच शेतकऱ्याने ओढा पार केला. त्यानंतर उर्वरित नागरिकांनीही याच दोरीचा आधार घेवून ओढ्याच्या पाण्यातून पलिकडचा तीर गाठला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. ओढ्याला पाणी आल्याने रस्ताच बंद झाला. यामुळे नागरिकांना आेढा पार करण्यासाठी कसरत करावी लागली. 

व्हिडिआे पाहण्यासाठी क्लिक करा - 
दोरीच्या आधारे पार केला आेढा

Web Title: Kolhapur News Heavy rains in Kadgaon