सर्किट बेंचच्या कार्यवाहीचा चेंडू उच्च न्यायालयाकडे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी पुढील कार्यवाही उच्च न्यायालयाने करणे अपेक्षित आहे, असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले. आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर त्यांनी हे लेखी उत्तर दिले आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किंट बेंच (परिक्रमा खंडपीठ) कोल्हापुरात होण्यासाठी गेली 32 वर्षे लढा सुरू आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी हे सर्किट बेंच व्हावे, अशी मागणी आहे. सुमारे सतरा हजार वकिलांची सुमारे दीड-दोन कोटी जनतेसाठी ही मागणी आहे. त्यासाठी अनेक वेळा चर्चा, आंदोलने, उपोषण अशी आंदोलने झाली आहेत. गतवर्षी अधिवेशनात झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली होती; मात्र त्यानंतर आजपर्यंत काहीच हालचाली झाल्या नाहीत. 

दरम्यान विधान परिषदेचे कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांनी सर्किट बेंचच्या सद्यःस्थितीबाबत माहिती देण्याची मागणी पावसाळी अधिवेशनात केली. त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले. त्यामध्ये म्हटले आहे की, "राज्य मंत्रिमंडळाने 12 मे 2015 च्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ स्थापन करण्याबाबत सकारात्मक विचार व्हावा, अशी शिफारस शासनाने मुख्य न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई यांना 17 जुलै 2017 च्या पत्रान्वये केलेली आहे. त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही उच्च न्यायालयाकडून होणे अपेक्षित आहे. त्यामुळे विलंबाचा प्रश्‍न उद्‌भवत नाही.' 

Web Title: kolhapur news high court