कोल्हापूर हद्दवाढीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

कोल्हापूर - कोल्हापूर शहराची हद्दवाढीसंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. शासनाच्या वतीने हद्दवाढीऐवजी कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन केले असून त्याचे कामकाज सुरू असल्याचे प्रतिज्ञापत्र शासनाच्या वतीने न्यायालयात सादर केल्याने हा निर्णय दिला.

कोल्हापूर - कोल्हापूर शहराची हद्दवाढीसंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. शासनाच्या वतीने हद्दवाढीऐवजी कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन केले असून त्याचे कामकाज सुरू असल्याचे प्रतिज्ञापत्र शासनाच्या वतीने न्यायालयात सादर केल्याने हा निर्णय दिला. कोल्हापूरची हद्दवाढ व्हावी यासाठी माजी नगरसेवक पांडुरंग आडसुळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

या याचिकेत त्यांनी शहराच्या हद्दवाढीसंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या आहेत. त्याची प्रक्रिया झाली आहे. तरीदेखील महापालिका हद्दवाढ करत नसल्याचे म्हटले होते. त्यावर महापालिकेने हद्दवाढ करत असल्याचे न्यायालयासमोर सांगण्यात आले होते; मात्र महापालिका हद्दवाढीसाठी चालढकल करून न्यायालयाचा अवमान करत असल्याचे याचिकेत म्हटले होते. त्यावर शासनाला म्हणणे सादर करण्यासाठी आज सुनावणी झाली. शासनाच्या नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी आज वरील प्रतिज्ञापत्र सादर केल्‍यामुळे याचिका निकाली काढली.

Web Title: Kolhapur News High Court rejected petition city boundary issue