दीड रुपयाने साखर महागणार

सुनील पाटील
रविवार, 22 जुलै 2018

कोल्हापूर - साखर खरेदी करणाऱ्या ग्राहकाला प्रतिकिलो एक ते दीड रुपया जादा मोजावे लागणार आहेत. कारण, साखर विक्रीवर सेस आकारण्यासह इथेनॉलवरील जीएसटी १८ टक्‍क्‍यांवरून पाच टक्के करण्यासाठी केंद्रीय खाद्य मंत्रालयाचे एकमत झाले आहे. मंत्रिमंडळाकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाईल. मंजुरीनंतर ग्राहकाला प्रतिकिलो साखर ३३ ते ३४ ऐवजी ३५ ते ३६ रुपयांनी खरेदी करावी लागणार आहे. 

कोल्हापूर - साखर खरेदी करणाऱ्या ग्राहकाला प्रतिकिलो एक ते दीड रुपया जादा मोजावे लागणार आहेत. कारण, साखर विक्रीवर सेस आकारण्यासह इथेनॉलवरील जीएसटी १८ टक्‍क्‍यांवरून पाच टक्के करण्यासाठी केंद्रीय खाद्य मंत्रालयाचे एकमत झाले आहे. मंत्रिमंडळाकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाईल. मंजुरीनंतर ग्राहकाला प्रतिकिलो साखर ३३ ते ३४ ऐवजी ३५ ते ३६ रुपयांनी खरेदी करावी लागणार आहे. 

आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या दरात मोठी घसरण सुरू आहे. यातच देशातील शेतकऱ्यांची गेल्या वर्षीच्या गळीत हंगामातील ‘एफआरपी’सह इतर २० हजार कोटी रुपये देणी अजून शिल्लक आहेत. त्यामुळे साखरेवर सेस लावण्याचा निर्णय खाद्य मंत्रालयाने घेतला आहे. याशिवाय, इथेनॉलवरील १८ टक्के जीएसटी हटवून पाच टक्के केला जाईल. साखरेवर लावलेल्या सेसची रक्कम ग्राहकांकडून आकारली जाणार आहे. ही रक्कम उसाची थकीत देणी देण्यासाठी दिली जाईल. खाद्य मंत्रालयाने साखरेवरील सेसचा निर्णय घेतला असला तरी त्यांना कॅबिनेटमध्ये तसा कायदा करावा किंवा अध्यादेश काढावा लागणार आहे. कारण, सेस रद्द होऊन जीएसटी लागू केल्याने ही अडचण येईल. तरीही, वर्षासाठी का असेना सेस आकारून ऊस उत्पादकांना दिलासा देण्याचे नियोजन आहे. सध्या घाऊक बाजारात प्रतिक्विंटल साखरेचे दर सरासरी ३१०० ते ३२०० रुपये आहे. 

साखरेवर सेस लावला जाऊ शकत नाही. लावलाच तर तसा कायदा करावा लागेल किंवा अध्यादेश काढावा लागेल. एकदा सेस लागला तर तो कायम राहू शकतो. इथेनॉलवरील १८ टक्के जीएसटी हटवून पाच टक्के केली जाणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास कारखान्यांसह शेतकऱ्यांना फायद्याचे होईल. 
- पी. जी. मेढे,
साखर उद्योगातील अभ्यासक

खुल्या बाजारात प्रतिकिलो साखरेचा दर ३३ ते ३४ रुपयांपर्यंत आहे. खुल्या विक्रीमधील साखरेवर दीड ते दोन रुपये सेस आकारल्यास प्रतिकिलो साखरेचा दर ३५ ते ३६ रुपयांपर्यंत होऊ शकतो. गेल्या वर्षी ग्राहकांनी प्रतिकिलो साखर ४३ ते ४४ रुपयांला खरेदी केली होती. यावर्षी प्रतिकिलो साखर ३३ ते ३४ रुपयांना घेत आहेत. त्यामुळे, यंदाच्या साखर विक्रीत दीड ते दोन रुपयांनी सेस वाढल्यामुळे ग्राहकांना साखर ३५ ते ३६ रुपये दरात मिळू शकते. वाढलेल्या दरातून देशातील शेतकऱ्यांचे थकीत असणारे २० हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. या मुद्यांवर खाद्य मंत्रालयाचे एकमत झाले असून, हा प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रिमंडळाकडे दिला जाणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर किंवा साखरेवरील सेसबाबत निर्णय झाल्यानंतर तत्काळ साखर विक्रीत वाढ होऊ शकेल. 
 

Web Title: Kolhapur News hike in Sugar Rate