किणी, तासवडे नाक्यावर पथकरात वाढ

संजय पाटील
रविवार, 1 जुलै 2018

घुणकी - पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी ( ता. हातकणंगले) व तासवडे (जि. सातारा) येथील नाक्यावरील  पथकरात आज (रविवार ता. १) मध्यरात्रीपासून दरवाढ केली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ५ ते १० रुपयांने दरवाढ केली आहे.

केंद्र शासनाच्या सुर्वण चर्तुभूज योजने अंतर्गत बाधा, वापरा व हस्तांतरण करा या तत्वावर शेंद्रे ( जि. सातारा ) ते  कागल ( जि. कोल्हापूर) दरम्यानचे १३३ किलोमीटर या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. चौपदरीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळकडून करण्यात आले.  २००५ पासून किणी व तासवडे येथे पथकर नाक्याच्या माध्यमातून पथकर जमा केला जातो. प्रतिवर्षी  १ जुलै रोजी नवीन पथकर जाहिर केला जातो.

आजपासून मोटार, जीप साठी ७० रुपये वरुन ७५ रूपये दरवाढ झाली असून हलक्या मालवाहतूक वाहनांना १२५  वरुन १३० रुपये,  ट्रक, बस, अवजड  वाहनांना २५० वरुन २६० रुपये अशी पथकरात वाढ झाली आहे. किणी व तासवडे येथील एकत्रीत पथकर मोटारीसाठी १४५  रुपये, हलक्या वाहनांसाठी २५० रुपये, ट्रकसह अवजड वाहनांसाठी ५१५ रुपये असा असणार आहे. 

        आजपासून असा पथकर 

                    किणी नाका                  किणी तासवडे एकञीत 
मोटार, जीप            ७५                      १४५
हलकी वाहने          १३०                    २६०
ट्रक ,बस,               २६०                    ५१५

Web Title: Kolhapur News hike in toll rate in Kini, Tasvade Naka