इचलकरंजी बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद

संजय खूळ 
सोमवार, 14 मे 2018

इचलकरंजी  - इचलकरंजी शहराला वारणा नदीतून पाणी मिळालेच पाहिजे या मागणीसाठी आज येथे पुकारलेल्या सर्व पक्षीय बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी सकाळपासून या बंद ला स्वयंस्फूर्ती ने पाठिंबा दिला आहे. 

इचलकरंजी शहराला वारणा नदी पात्रातून पाणी आणण्यासाठी योजना मंजूर झाली आहे. या योजनेचे काम सुरु करताना दानोळी ता,शिरोळ येथे नागरिकांनी तीव्र विरोध केला.प्रशासनाने पोलीस फोर्स घेऊन काम सुरु करण्याचा प्रयत्न केला पण त्या वेळी वारणा नदी काठच्या लोकांनी गाव बंद ठेऊन प्रतिकार केला. याबाबत इचलकरंजीकर रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. सर्व पक्षीय नेत्यांनी आंदोलनाचा कृती आराखडा केला असून आज सर्वपक्षीय बंद पुकारला. सकाळ पासून सर्व व्यवहार ठप्प आहेत. रिक्षा,एस,टी सेवा ही बंद आहे. उद्यापासून बेमुदत साखळी उपोषणासही सुरुवात होणार आहे.

Web Title: Kolhapur News Ichakarani Band for water from warana River