भारतीय स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी साजरा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

शहर व परिसरातील शाळा, महाविद्यालये, संस्था, संघटना, शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज संस्थांतर्फे 71 वा भारतीय स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी साजरा झाला. प्रबोधनपर व्याख्याने, प्रभातफेरी, विविध स्पर्धांच्या माध्यमातून क्रांतिकारकांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. 

शहर व परिसरातील शाळा, महाविद्यालये, संस्था, संघटना, शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज संस्थांतर्फे 71 वा भारतीय स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी साजरा झाला. प्रबोधनपर व्याख्याने, प्रभातफेरी, विविध स्पर्धांच्या माध्यमातून क्रांतिकारकांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. 

कोल्हापूर महापालिका 
कोल्हापूर :
महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर हसीना फरास यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समितीचे सभापती डॉ. संदीप नेजदार, प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापती वनिता देठे, सभागृह नेते प्रवीण केसरकर, विरोधी पक्षनेते किरण शिरोळे, प्रभाग समितीच्या सभापती सुरेखा शहा, गटनेते सुनील पाटील, सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, नगरसेवक आशिष ढवळे, राजाराम गायकवाड, ईश्‍वर परमार, महेश सावंत, अशोक जाधव, तौफिक मुल्लाणी, अजिंक्‍य चव्हाण, अजित ठाणेकर, संभाजी जाधव, महेश सावंत, संजय मोहिते, नगरसेविका जयश्री जाधव, रिना कांबळे, सविता भालकर, मेहजबीन सुभेदार, सुनंदा मोहिते, रूपाराणी निकम, अर्चना पागर, ललिता बारामते, सरिता मोरे, प्रभारी उपायुक्त मंगेश शिंदे, प्रभारी सहाय्यक आयुक्त संजय भोसले, संजय सरनाईक, मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंदळे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आरोग्याधिकारी डॉ. अरुण वाडेकर, उपशहर अभियंता एस. के. माने, आर. के. जाधव, हर्षजित घाटगे, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अंजली जाधव, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातर्फे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजवंदन कार्यक्रम झाला. उपअधिष्ठाता डॉ. वसंत देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, महेश जाधव, अध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. 

मौलाना अबुलकलाम आझाद ऊर्दू विद्यालय 
महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती वहिदा सौदागर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. मौलाना महंमद इरफान कासमी यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थाध्यक्ष नूरमहंमद सरखवास, उपाध्यक्ष हाजी शौकत मुतवल्ली, सचिव बाबासाहेब मुल्ला, शालेय समितीचे अध्यक्ष मक्तुम देसाई, उपाध्यक्ष कासीम नदाफ, संचालक कासीम मुल्ला, इस्माईल गडवाले, दस्तगीर अकिवाटे आदी उपस्थित होते. एच. ए. म्हालदार यांनी आभार मानले. 

जीवनदीप विद्यामंदिर, कोपार्डे 
संजय पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. बाळासाहेब जगदाळे यांनी स्वागत केले. शिवाजी पाटील, मामा पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. सर्जेराव राणे यांनी आभार मानले. 

स्वयम विशेष मुलांची शाळा 
चाटे समूहाचे विभागीय संचालक प्रा. भारत खराटे यांनी ध्वजवंदन केले. श्री. खराटे यांनी पाच, अनिरुद्ध तगारे यांनी पाच, रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर सेंटरतर्फे एक, मिलिंद करमळकर यांनी एक, कुलदीप कामत यांनी पाच, शेफाली मेहता यांनी एक विद्यार्थी दत्तक घेतला. संदीप पोरे यांनी गणवेश, तर हरीश सेवलानी यांनी शालेय बूट दिले. कौसाबाई लाखे, एम. बी. शेख, रेखा सारडा, गिरीश गुळवे यांनी खाऊचे वाटप केले. शाळेचे अध्यक्ष राजूभाई दोशी यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक प्रमोद भिसे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीनिवास मालू यांनी आभार मानले. 

महालक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बॅंक 
अध्यक्ष प्रकाश सांगलीकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. उपाध्यक्षा मेघा जोशी, संचालक केदार हसबनीस, महेश धर्माधिकारी, उदय महेकर, संदीप कुलकर्णी-कौलगेकर, व्यवस्थापक महेश देशपांडे, कर्मचारी उपस्थित होते. 

Web Title: kolhapur news Independence Day kolhapur