रोस्टर पूर्ण; आंतर जिल्हा बदली सुकर

राजेंद्र पाटील
बुधवार, 31 मे 2017

जिल्ह्यात ३३७ शिक्षकांची पदे रिक्त; खुल्या वर्गातील ३९७ शिक्षक जादा

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे रोस्टर पूर्ण झाले. त्यामुळे शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलीचा व नवीन शिक्षक भरतीचा मार्ग सुकर झाला आहे. रोस्टरनुसार सध्या ३३७ अध्यापकांची पदे रिक्त आहेत.

जिल्ह्यात ३३७ शिक्षकांची पदे रिक्त; खुल्या वर्गातील ३९७ शिक्षक जादा

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे रोस्टर पूर्ण झाले. त्यामुळे शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलीचा व नवीन शिक्षक भरतीचा मार्ग सुकर झाला आहे. रोस्टरनुसार सध्या ३३७ अध्यापकांची पदे रिक्त आहेत.

कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अध्यापक संवर्गाचे रोस्टर पुणे विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी तपासणी करून काल मंजुरी दिली. रोस्टर पूर्ण असल्याखेरीज बाहेरील जिल्ह्यातून बदलीने कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या शिक्षकांना सामावून घेतले जाणार नव्हते. त्यामुळे आता रोस्टर प्रमाणित झाल्याने आंतर जिल्हा बदलीचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या तीन-चार वर्षांपासून शिक्षण विभागाचे रोस्टर अद्ययावत नव्हते. गेल्या सात-आठ महिन्यांपासून ते अद्ययावत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार व शिक्षणाधिकारी सुभाष चौगले यांच्या सूचनेनुसार कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस कागदपत्रांची सूक्ष्म पडताळणी केली. हजारो शिक्षकांचे नेमणुकीचे आदेश, निवडीचा प्रवर्ग, जातीचे दाखले, जातपडताळणी प्रमाणपत्र, आंतर जिल्हा बदली आदेश या सर्व कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करून सुमारे ७८७६ शिक्षकांचे रोस्टर अद्ययावत करण्यात आले. बिंदुनामावलीनुसार या पदांना सहाय्यक आयुक्तांनी मंजुरी दिली. उपशिक्षणाधिकारी ए. जी. मगदूम, कक्ष अधिकारी संजय जाधव, प्रसाद पाटील, रोस्टर चळवळीचे जिल्हाध्यक्ष सुनील पोवार व त्यांचे सहकारी व शिक्षक या सर्वांनी रोस्टर पूर्ण करणेसाठी विशेष परिश्रम घेतले. 

शिक्षक पदांचे रोस्टर पूर्ण झाल्याने आंतर जिल्हा बदलीने कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या सुमारे दोनशेवर शिक्षकांचा मार्ग मोकळा झाला आहे. खुला व विशेष मागास प्रवर्गाखेरीज इतर संवर्गातील शिक्षकांना कोल्हापूर जिल्हा परिषदेत सामावून घेतले जाईल. 
- सुभाष चौगले, शिक्षणाधिकारी, जि.प. कोल्हापूर.

Web Title: kolhapur news inter district transfer