मंत्री चंद्रकांत पाटील तपासणास महापालिकेचा 20 वर्षातील कारभार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

कोल्हापूर - पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरातील २० वर्षांतील आरक्षणे, हॉटेल सयाजीजवळील डीपी रोड आणि रमणमळ्यातील वॉटर बॉडीशी संबंधित सर्व कागदपत्रांची माहिती महापालिकेच्या आयुक्तांकडून मागविली आहे. तसे पत्र त्यांनी आयुक्तांना दिले आहे. सार्वजनिक जमिनीवर आलिशान इमारती उभारणाऱ्यांचा पदार्फाश करण्यासाठी ही माहिती मागविली आहे.

कोल्हापूर - पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरातील २० वर्षांतील आरक्षणे, हॉटेल सयाजीजवळील डीपी रोड आणि रमणमळ्यातील वॉटर बॉडीशी संबंधित सर्व कागदपत्रांची माहिती महापालिकेच्या आयुक्तांकडून मागविली आहे. तसे पत्र त्यांनी आयुक्तांना दिले आहे. सार्वजनिक जमिनीवर आलिशान इमारती उभारणाऱ्यांचा पदार्फाश करण्यासाठी ही माहिती मागविली आहे.

पालकमंत्री पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे, पालकमंत्रिपद स्वीकारल्यापासून शहरासह जिल्ह्याचा विकासाचा मोठा डोलाराच उभा केला आहे. शहरातदेखील विविध माध्यमातून विकासकामे सुरू आहेत. जनतेवर लादलेले ५०० कोटींचे टोलचे भूत आम्हीच गाडले. शहरात विकासकामांचा धडाका पाहून विरोधकांच्या मनात धडकी भरू लागल्याने जिल्ह्यातील सूर्याजी पिसाळ जागे झाले असून चुकीचे आरोप करत सुटले आहेत. यासाठी जनतेसमोर सत्य बाहेर येण्यासाठी पालिकेतील कारभाराची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

रमणमळा, नागाळा पार्क येथील वॉटर बॉडी अगर त्या नावाशी सुसंगत जागेबाबत माहिती. ही जागा कोणाच्या मालकीची? डेव्हलपमेंट प्लॅननुसार जागेचा जमीन वापर काय आहे? सध्या ही जागा महापालिकेने एखाद्या संस्थेस अगर व्यक्तीस हस्तांतरित केली असल्यास तो कोणत्या प्रकारच्या कराराने किती वर्षासाठी व कोणत्या अटी शर्तीसह हस्तांतरित केली आहे? हस्तांतराबाबत  महापालिका महासभेने केलेल्या ठरावास शासनाची मंजुरी मिळाली आहे का?

पालिका आपल्या ताब्यात ठेवून त्यावरील लोणी खाणाऱ्यांची पळताभुई थोडी होण्याची सुरुवातच झाली आहे. पालिकेच्या आयुक्तांना पत्र देऊन १९९५ ते २०१५ या वर्षातील आरक्षणाची माहिती मागविली आहे. हॉटेल सयाजी येथील डी.पी. रस्त्याची, तसेच वॉटर पार्कची संबंधित माहिती आयुक्तांना देण्यास सांगितली आहे. या माहितीवरून या प्रकरणातील झोल जनतेसमोर येईल. जनतेच्या पैशावर कुणी कुणी तुंबड्या भरून आपले बंगले, जमिनी, रुग्णालये उभी केली, याचा पर्दाफाश करण्यासाठीच हे पत्र देऊन माहिती उघड करण्याचा प्रयत्न आहे.

मागवलेल्या माहितीचा तपशील
पालिका क्षेत्रातील हॉटेल सयाजी, जुना पुणे - बंगलोर हायवे, कावळा नाका रुक्‍मिणीनगर परिसरातील डी.पी. रोड व अन्य कारणासाठी पालिकेने आरक्षित केलेली जागा संपादित केली आहे का? संपादन केली असल्यास सध्या हा डी.पी. रोड मोकळा केला आहे का? व वापरात घेतली का?

 

 

Web Title: Kolhapur News investigation of 20 years corporation management