विश्वास नांगरे पाटील यांच्या गाडीला अपघात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील विमानतळाकडे जात असताना उजळाईवाडी जवळ त्यांच्या सरकारी गाडीचा अपघात झाला.

कोल्हापूर - कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या गाडीचा सोमवारी दुपारच्या सुमारास अपघात झाला. यात ते सुखरुप असल्याचे समजते.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी ते मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूर विमानतळावर आले. त्यावेळी कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील विमानतळाकडे जात असताना उजळाईवाडी जवळ त्यांच्या सरकारी गाडीचा अपघात झाला.

गाडी भरधाव वेगाने जात असताना एका वळणावर त्यांच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्यात जाऊन पडली. दरम्यान, या अपघातात विश्वास नांगरे पाटील किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यासह तिघेजण सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: kolhapur news ips vishwas nangare patil accident