प्रशासनाकडून कामगारांना अव्यवहार्य मजुरीवाढ - यंत्रमागधारक संघटना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

इचलकरंजी - प्रशासनाने यंत्रमाग कामगारांना अव्यवहार्य मजुरीवाढ जाहीर केली आहे. यामुळे यंत्रमाग उद्योग ठप्प होणार आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांनी मजुरीवाढ देऊ नये, असे आवाहन यंत्रमागधारक संघटनांनी केले आहे.

इचलकरंजी - प्रशासनाने यंत्रमाग कामगारांना अव्यवहार्य मजुरीवाढ जाहीर केली आहे. यामुळे यंत्रमाग उद्योग ठप्प होणार आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांनी मजुरीवाढ देऊ नये, असे आवाहन यंत्रमागधारक संघटनांनी केले आहे.

इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, जिल्हा पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष दीपक राशिनकर, यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन, पॉपलीन यंत्रमागधारक संघटनेचे अध्यक्ष सचिन हुक्किरे, साधे यंत्रमागधारक संरक्षण समितीचे विश्‍वनाथ मेटे यांनी संयुक्त प्रसिद्धीपत्रक दिले आहे. सध्या उद्योगात मंदीचे वातावरण असल्यामुळे मजुरीवाढ करू नये, अशी मागणी यंत्रमागधारक संघटनांनी सहायक कामगार आयुक्तांकडे केली होती. त्यानंतरही मजुरीवाढ केली. ती अन्यायकारक आहे. मजुरीवाढ करून प्रशासनाने व्यवसायास टाळेबंदी करण्याकडे भाग पाडले आहे, असे पत्रकात स्पष्ट केले आहे.

मालक-कामगार संघर्ष
मजुरीवाढीबाबत प्रशासन आणि कामगार संघटना असा संघर्ष सुरु होता. प्रशासनाने मजुरीवाढ जाहीर करून जबाबदारी पूर्ण केली. आता यंत्रमागधारक व कामगारांत मजुरीवाढप्रश्‍नी संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. मात्र, हा संघर्ष कारखाना पातळीवर होण्याची अधिक शक्‍यता आहे.

सध्या अस्तित्वात असलेली मजुरी देताना यंत्रमागधारक मेटाकुटीस येत आहे. कापडास मागणी नाही. अपेक्षित तर मिळत नाही. गेल्या तीन वर्षांत खर्चीवाले यंत्रमागधारकांची एक पैशाची मजुरीवाढ जाहीर केलेली नाही. इचलकरंजी सोडून अशी दरवर्षी यंत्रमाग कामगारांची मजुरीवाढ इतरत्र होत नाही. तुलनेने उत्पादन खर्च वाढला असून, कापडाची मागणी घटलेली आहे. प्रशासनाने जाहीर केलेली मजुरीवाढ देणे अशक्‍य आहे, असे पत्रकात नमूद केले आहे.

Web Title: Kolhapur News issue of hike in salary of Power loom worker