महागोंडचे जॅकवेल कोसळले

अशोक तोरस्कर
गुरुवार, 5 जुलै 2018

उत्तूर - गेले काही सुरु असलेल्या पावसामुळे महागोंड (ता. आजरा ) येथील सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजनेतील जॅकवेल कोसळले. यामुळे आता गावाला ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

आंबेओहळ नाल्याच्या पात्राजवळ तीस वर्षापुर्वी  हे जॅकवेल बांधले होते. जॅकवेलचे बांधकाम दगडी होते. गेल्या दोन तीन वर्षापूर्वी जॅकवेलच्या काही भागाची पडझड झाली होती. यामुळे नवीन बांधकामासाठी ग्रामस्थांनी प्रस्ताव दिला होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेकडे  नवीन जॅकवेलच्या निधीसाठी प्रस्ताव देण्यात आला होता. ग्रामस्थांकडून याबाबत पाठपुरावा सुरु होता. मात्र यापुर्वीच जॅकवेल कोसळले.

गावच्या पिण्याच्या पाण्याचा विचार करुन शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. 

- अनिल पाटील, माजी सरपंच

Web Title: Kolhapur News jack well collapses in Mahagond