कोल्हापूरात गुळास मुहूर्ताच्या सौद्यात 3800 ते 5770 रुपये दर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

बाजारसमिती आवारातील विक्रम खाडे यांच्या दुकानात हे सौदे काढण्यात आपले. सभापती सर्जेराव पाटील, उपसभापती आशालता पाटील यांच्यासह संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत सौदे काढण्यात आले. 

कोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजारसमितीत आज (शुक्रवारी) पाडव्यानिमित्त काढण्यात आलेल्या मुहूर्ताच्या सौद्यात गुळाला प्रति क्विंटल 3800 ते 5770 इतका दर मिळाला.

बाजारसमिती आवारातील विक्रम खाडे यांच्या दुकानात हे सौदे काढण्यात आपले. सभापती सर्जेराव पाटील, उपसभापती आशालता पाटील यांच्यासह संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत सौदे काढण्यात आले. 

आज बाजारसमितीत सुमारे 20 हजार गूळ रव्याची आवक झाल्याचे बाजार समितीचे सचिव दिलीप राऊत यांनी सांगितले. यंदा पाऊस झाल्याने गुऱ्हाळे सुरू होण्यास थोडा अवधी लागण्याची शक्यता आहे. या मुळे गुळाची नियमित आवक होण्यास आठ ते दहा दिवसाचा कालावधी लागेल असा अंदाज बाजारसमितीच्या सूत्रांनी व्यक्त केला.

Web Title: Kolhapur news Jaggery auction in Kolhapur