कोल्हापुरी गुळाला केरळ, बंगालची प्रतीक्षा

शिवाजी यादव
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - कोल्हापुरी गूळ बाजारपेठेत पारंपरिक पद्धतीच्या चौकटीत यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात होत आहे. कोल्हापुरात गूळ बनवायचा व गुजरातला पाठवायचा हीच पद्धत आजवर दृढ आहे. यंदा कोलकत्यापासून केरळपर्यंतच्या खाद्यसंस्कृती गोडीला महत्त्व असल्याने परराज्यात कोल्हापुरी गुळाचा गोडवा पोचवला पाहिजे. त्यासाठी प्रभावी मार्केटिंग तंत्राचा वापर सर्वच पातळ्यांवर आवश्‍यक बनला आहे.

कोल्हापूर - कोल्हापुरी गूळ बाजारपेठेत पारंपरिक पद्धतीच्या चौकटीत यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात होत आहे. कोल्हापुरात गूळ बनवायचा व गुजरातला पाठवायचा हीच पद्धत आजवर दृढ आहे. यंदा कोलकत्यापासून केरळपर्यंतच्या खाद्यसंस्कृती गोडीला महत्त्व असल्याने परराज्यात कोल्हापुरी गुळाचा गोडवा पोचवला पाहिजे. त्यासाठी प्रभावी मार्केटिंग तंत्राचा वापर सर्वच पातळ्यांवर आवश्‍यक बनला आहे. अशा प्रभावी तंत्रातूनच यंदाचा हंगाम नेटाने चालवला तरच गूळ उत्पादकांना चांगला भाव मिळून कोल्हापुरी गुळाचा लौकिक वाढेल.

शाहू मार्केट यार्डातील गूळ बाजारात पूर्वी जवळपास ३० ते ३५ लाख गूळ रव्यांची विक्री होत होती. दोन वर्षात उत्पादनात घटल्याने केवळ २५ लाख गूळ रवे बाजारात येतात. ३०० कोटींची उलाढाल अवघ्या २०० कोटीपर्यंत खाली घसरली. गुऱ्हाळघरांना मनुष्यबळ पुरेसे मिळत नसल्याने गुऱ्हाळघरांची संख्या साडेनऊशेवरून २०० वर आली. गुऱ्हाळघरे मराठवाड्यातून येणाऱ्या गुळकरी कामगारांकडून गूळ उत्पादन घेण्यावर अवलंबून आहेत. अनेक गूळ उत्पादकाच्या कुटुंबात तरुण मंडळी आहेत.

बाजारपेठेत दोन वर्षात व्यापाऱ्यांना गुळाला चांगला भाव मिळाला, यंदाही तसाच मिळू शकेल, मात्र त्यात जितका गूळ चांगला तितका भावही चांगला देण्यास व्यापारी तयार आहेत, तर बाजारपेठेत सौद्याचे वजन इलोक्‍ट्रॉनिक्‍स काट्यावर करण्याची काटेकोर अंमलबजावणीसाठी बाजार समिती करत आहे. त्यामुळे घट तूट कमी होण्यास व वजनानुसार पैसे मिळण्यास मदत होत आहे.  

परप्रांतात मार्केटिंग व्हावे  
कोल्हापुरातील गुळाला गुजरातमध्ये सर्वाधिक मागणी असते, मात्र पाच वर्षांत गुजरातमध्येही उत्तर प्रदेश, हरियाना, चंदीगड येथून गूळ जातो. त्यामुळे कोल्हापुरी गुळाला तिथे स्पर्धा आहे. अशा बंगाल, केरळ, आंध्र प्रदेशाच्या खाद्य सांस्कृतिक गोड पदार्थांचे महत्त्व आहे. बंगालमध्ये मिठाई उद्योग तेजीत आहे. अशात पदार्थात साखरेऐवजी गूळ कसा लाभदायक ठरू शकतो, याची माहिती पदार्थ तज्ज्ञांकडून मिळू शकते. 

Web Title: Kolhapur news Jaggery market in Keral, Bangal