गुळाचा साैदा...(व्हिडिआे)

बी. डी. चेचर
गुरुवार, 18 जानेवारी 2018

कोल्हापूर - हा उसाचा पट्टा म्हणून आेळखला जातो. तसाच तो गुळ उत्पादनासाठीही प्रसिद्ध आहे. येथील गुळाला देशभरातून मागणी आहे. जिल्ह्यात जवळपास 250 गुऱ्हाळघरावर गुळाची निर्मिती होते. हा तयार झालेला गुळ कोल्हापूर येथील शाहूू मार्केट यार्डात विक्रीसाठी शेतकरी पाठवतात. तेथे साैदे कसे चालतात. बाजारपेठ कशी असते. व तो गुळ ग्राहकापर्यंत कसा येतो याची माहिती देणारा हा व्हिडिआे.... (व्हिडिआे - बी. डी. चेचर)

सध्या बाजारपेठेनुसार गुळाची निर्मिती करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. यापूर्वी 35 किलोचे गुळाचे रवे केले जायचे व ते विक्रीसाठी पाठवले जात होते. पण इतकी मोठी गुळाची ढेप घेणे आता ग्राहकांना शक्य होत नाही. तशी त्यांची मागणीही नसते. त्यासाठी शेतकऱ्यांनी ग्राहकांचा विचार करून गुळाच्या आकारात बदल केला आहे. 30 किलो गुळाच्या रव्यापासून आता एक किलो पाच किलो असे लहान लहान गुळाचे रवेही उत्पादित केले जातात. तसेच मोदकाच्या आकाराचे रवे, चाैकोनी प्लेटा याचे उत्पादन करण्यावर गुळ उत्पादकांनी भर दिला आहे. बाजारपेठेनुसार आता उत्पादनातही असा बदल झाला आहे.  गुळाच्या रंगानुसार गुळाचा दर ठरतो. तपकरी आणि पिवळ्या रंगाच्या गुळास वेगवेगळा दर असतो. तसेच गुळाचा दर्जा चवीनुसार तपासला जातो व त्यानुसारही बोली बोलली जाते. बोली झाल्यानंतर गुळाची तोलाई होते. तोलाई झालेला हा गुळ मांजरपाटाच्या कापडामध्ये पॅक करून बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवला जातो. 

Web Title: Kolhapur News Jaggery market video story

टॅग्स