कारागृहात घडणाऱ्या देव्हाऱ्याला मागणी

लुमाकांत नलवडे
शुक्रवार, 28 जुलै 2017

कोल्हापूर - क्षणिक रागातून त्यांनी चूक केली आणि आज त्याची शिक्षा ते मध्यवर्ती कळंबा कारागृहात भोगत आहेत. कोण सुतार, कोण टेलर, कोण कुक तर कोण डिझायनर. त्यांचा उपयोग अधीक्षकांनी करून घेतला आणि कारागृहातच देव्हाराही घडू लागला. तसेच टॉवेल, बेडसीट, खुर्च्या, टेबल, बेकरी उत्पादनेही तयार झाली आणि बघताबघता कारागृहातील विक्री केंद्राची उलाढाल दोन कोटींहून अधिक झाली.

कोल्हापूर - क्षणिक रागातून त्यांनी चूक केली आणि आज त्याची शिक्षा ते मध्यवर्ती कळंबा कारागृहात भोगत आहेत. कोण सुतार, कोण टेलर, कोण कुक तर कोण डिझायनर. त्यांचा उपयोग अधीक्षकांनी करून घेतला आणि कारागृहातच देव्हाराही घडू लागला. तसेच टॉवेल, बेडसीट, खुर्च्या, टेबल, बेकरी उत्पादनेही तयार झाली आणि बघताबघता कारागृहातील विक्री केंद्राची उलाढाल दोन कोटींहून अधिक झाली.

कळंबा मध्यवर्ती कारागृह. या कारागृहाच्या इमारतीबाहेर रस्त्याला लागूनच त्यांचे विक्री केंद्र आहे. रस्त्यावरील कोणीही ग्राहक थांबून तेथे वस्तू खरेदी करू शकतो. दैनंदिनी जीवनात ज्या वस्तू, उत्पादने आवश्‍यक असतात, त्यांची येथे विक्री होते. सकाळी आठपासून सायंकाळी सहापर्यंत हे केंद्र सुरू असते. विशेष करून शासकीय कार्यालयात आवश्‍यक वस्तू येथे तयार केल्या जातात. त्यांच्या ऑर्डर कारागृहाला देण्यात येतात. मात्र हाच विभाग सर्व नागरिकांना उपलब्ध व्हावा ही कल्पना पुढे आली होती. त्यानुसार रिटेल विक्री केंद्राची उभारणी करण्यात आली. कारागृहातील उत्पादनाची विक्री वर्षाभरात तब्बल दोन कोटींहून अधिक उलाढाल झाल्याचे अधीक्षक शरद शेळके यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

एकूण नऊ प्रकारची उत्पादने कारागृहात घेतली जात आहेत. यामध्ये बेकरी, लाडू, साड्यांवरील जरीकाम, टेलर, हॅण्डलूम, पावर लुम, सुतार काम, लोहार काम, फाऊंड्री उद्योग  यांचा यामध्ये समावेश आहे. बेकरी उत्पादनात खारी, बटर पासून इतर उत्पादने तयार होतात. त्याचीही विक्री या केंद्रात होते. अनेक बंदीजन हे उत्कृष्ट टेलर काम करतात. त्यांच्या हातून तयार होणारे बेडसीट, पिलो-कव्हरचे डिझाईन उत्कृष्ट आहेत. येथील सुतारकाम करणारे बंदीजन आहेत. त्यांनी तयार केलेल्या देव्हाऱ्याला अधिक मागणी आहे. काही खासगी ग्राहकही त्यांना पाहिजे त्या पद्धतीचे फर्निचर येथून करून घेतात. येथे तयार होणाऱ्या व्हीलच्या लाकडी खुर्च्यांनाही अधिक मागणी आहे. साधे, टर्किश टॉवेल जादा दिवस टिकण्याची हमखास गॅरेंटी येथे दिली जाते. बाजारातील विक्री किमतीपेक्षा काही प्रमाणात कमी किंमत येथे असल्याचे दिसून येते. महालक्ष्मी मंदिरातील प्रसादासाठी देण्यात येणारे लाडूसुद्धा येथेच तयार होताम. साड्यांना जरी लावण्याचे काम येथील महिला करीत आहेत.

कारागृहातील उत्पादनांना चांगली मागणी आहे. येथे घडलेल्या देव्हाऱ्याला अधिक मागणी आहे. एकूण नऊ प्रकारचे विभाग येथे आहेत. सरकारी कार्यालयांसाठी आवश्‍यक वस्तू येथे बनविल्या जातात. त्यातीलच काही उत्पादने रिटेल विक्री केंद्रात ठेवतो. वर्षात दोन कोटींहून अधिक विक्री झाली आहे. पण सध्या कच्च्या मालाचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे हे केंद्र काही दिवस बंद ठेवावे लागले आहे. लवकरच पुन्हा हे केंद्र सुरू करणार आहे.
- शरद शेळके, अधीक्षक, कळंबा मध्यवर्ती कारागृह

Web Title: kolhapur news jail Kalamba Jail

टॅग्स