दोघा संशयितांना घटनास्थळी फिरवले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

जयसिंगपूर - उदगाव (ता. शिरोळ) येथील दरोडा आणि महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी संशयितांच्या मुसक्‍या आवळल्या. याप्रकरणी तासगाव, कवठेमहांकाळ भागातील सहाजणांची कसून चौकशी सुरू आहे. महिलेच्या खुनात सहभाग असणाऱ्या संशयितांवर पोलिसांनी ट्रॅप लावला आहे. दरम्यान, दोघांना आज घटनास्थळी फिरवले. 

जयसिंगपूर - उदगाव (ता. शिरोळ) येथील दरोडा आणि महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी संशयितांच्या मुसक्‍या आवळल्या. याप्रकरणी तासगाव, कवठेमहांकाळ भागातील सहाजणांची कसून चौकशी सुरू आहे. महिलेच्या खुनात सहभाग असणाऱ्या संशयितांवर पोलिसांनी ट्रॅप लावला आहे. दरम्यान, दोघांना आज घटनास्थळी फिरवले. 

14 ऑगस्टला उदगाव येथील निकम मळ्यातील बाबूराव निकम यांच्या घरावर सशस्त्र दरोडा पडला होता. यावेळी प्रतिकार करणाऱ्या सौ. अरुणा निकम यांची हत्या केली होती. यामध्ये 25 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लुटली होती. शांत डोक्‍याने दरोडा आणि हत्या केल्यानंतर कोणताही पुरावा मागे सोडला नसल्याने पोलिस यंत्रणाही चक्रावली होती. कोल्हापूर, इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण व जयसिंगपूर पोलिसांनी संयुक्तपणे तपास मोहीम राबवली. 

कोल्हापूर, सांगली, नगर, बीड जिल्ह्यांतील दरोडेखोरांची माहिती घेत असताना मिळालेल्या धाग्यावरून तासगाव, कवठेमहांकाळ परिसरातील डोंगरी भागात सहाजणांना जेरबंद केले. निकम यांच्यावर हल्ला करणाऱ्या अन्य एका संशयिताच्या मागावर पोलिस आहेत. दरम्यान, कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. 

अटकेत असलेल्या सहापैकी दोघांना घटनास्थळी फिरवले. प्राप्त माहितीनुसार मदरशाजवळ गाडी थांबवून सातजणांनी खिडकीत हात घालून मुख्य दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. चौघेजण टेहाळणी करत असताना तिघांनी घरात घुसून प्रतिकार करणाऱ्या सौ. निकम यांच्यावर हल्ला करून घरातील तिजोरी उचकटून दागिने व रोकड लंपास करून पोबारा केला. अटकेत असणाऱ्यांकडील जप्त केलेल्या मुद्देमालात निकम यांचे दागिने नसल्याने स्पष्ट झाले असले तरी पोलिस लवकरच दागिन्यांचा शोध घेतील, असे सांगण्यात आले. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणने ताब्यात घेतलेले संशयित हेच उदगाव दरोडा व हत्या प्रकरणात सहभागी असल्याचाही दुजोरा एका अधिकाऱ्याने दिला आहे. 

सुतावरून स्वर्ग 
या दरोड्यात पुरावा मागे न ठेवल्याने पोलिस यंत्रणा चक्रावली होती. केवळ गुन्ह्याच्या पद्धतीवरून कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणने विविध जिल्ह्यातील अशा घटना आणि आरोपींची माहिती घेण्याचे काम करत असताना मिळालेल्या धाग्यावरून सहाजणांना जेरबंद केले. हत्येतील आणखी एकाला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा होणार असून, कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणची कामगिरी पोलिस खात्याची प्रतिमा उंचावणारी ठरणारी आहे.

Web Title: kolhapur news Jaysingpur