जयसिंगपूर जैन मंदिरातील चोरी प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती

राजेंद्र होळकर
गुरुवार, 29 मार्च 2018

इचलकरंजी -  जयसिंगपूर येथील तिसऱ्या गल्लीमधील जैन श्‍वेतांबर मंदीरामध्ये झालेल्या सुमारे 14 लाखांच्या धाडसी चोरीप्रकरणाचा पोलिसांची वेगवेगळी पथके तपास करीत आहे. या तपासी पथकांच्या हाती चोरट्यांची धागेदोरे लागले असून, पोलीस पथके त्यांच्या मार्गावर रवाना झाली आहेत, अशी मागणी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांने दिली.

जयसिंगपूर येथील स्टेशन रोडवरील जैन श्‍वेतांबर मंदीरामध्ये चोरट्यांनी पंधरा दिवसापूर्वी मंदीरालगतच्या बंद कार्यालयांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कार्यालयातील लोंखडी कपाड फोडले. यामध्ये त्यांच्या हाती स्ट्रॉंग रुम चाव्या लागल्या. तेथून  20 तोळ्याचे सोन्याचे आणि 10 किलो वजनाचे चांदीच्या दागिण्यासह पाच लाखांची रोकड असा सुमारे 14 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता.

या भरवस्तीमध्ये झालेल्या धाडसी चोरीची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली. या चोरीचा छडा लावण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी तपास पथके चोरट्यांच्या शोधासाठी रवाना केली. याच दरम्यान तपासी पथकांना या मंदीरामध्ये झालेल्या धाडसी चोरीचे दागेदोरे लागले. ही पथके गेल्या काही दिवसापासून चोरट्यांच्या मार्गावर रवाना झाली असून, चोरट्यांना पकडण्यासाठी कोल्हापूर स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे, जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे आणि इचलकरंजी स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या तपासी पथकांची शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे या मंदीर चोरीतील चोरट्यांच्या लवकरच मुसक्‍या आवळल्या जातील, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांने दिली.

Web Title: Kolhapur News Jaysingpur Jain Temple robbery case