चैत्र यात्रेत गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाची जोरात तयारी सुरू - आर.  आर. पाटील

निवास मोटे
मंगळवार, 20 मार्च 2018

जोतिबा डोंगर - यंदाच्या चैत्र यात्रा काळात सलग चार दिवस  सुट्टी असल्याने गर्दीचा उंचाक होईल, असे वाटते त्यामुळे प्रशासनाने ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी जोरात तयारी सुरू केल्याची माहिती शाहूवाडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आर आर पाटील यांनी आज जोतिबा डोंगरावर दिली.  

जोतिबा डोंगर - यंदाच्या चैत्र यात्रा काळात सलग चार दिवस  सुट्टी असल्याने गर्दीचा उंचाक होईल, असे वाटते त्यामुळे प्रशासनाने ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी जोरात तयारी सुरू केल्याची माहिती शाहूवाडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आर आर पाटील यांनी आज जोतिबा डोंगरावर दिली.  

चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर ते बंदोबस्त नियोजन व परिसराची पाहणी करण्यासाठी ते जोतिबा डोंगरावर आले होते  श्री पाटील यांनी आज जोतिबावरील यमाईदेवी मंदीर परिसर सेंट्रल प्लाझा एसटी बस स्थानक परिसर मुख्य बाजार पेठ जोतिबा मंदिर परिसर ठाकरे मिटकेगल्ली या ठिकाणीची पाहाणी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या. 

जोतिबा डोंगर येथील चैत्र यात्रेत यंदा सलग सुट्यामुळे मोठी गर्दी होणार हे निश्चित आहे त्यामुळे बंदोबस्ताचे सर्व नियोजन करण्यात येत आहे यात्रा सुरळीत पणे पार पाडण्यासाठी यंत्रणेस भाविक व ग्रामस्थांनी सहकार्य करावे  डोंगरावर येणारा भाविक सुखरूप  आपल्या घरी जाववा यासाठी पोलीस यंत्रणा परिश्रम घेईल.

- आर. आर. पाटील  
शाहूवाडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी 

यंदा सुट्या व दुसऱ्या दिवशी पाकाळणीचा रविवार असल्याने गर्दी सलग दोन दिवस असणार आहे. घाटात ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून वाॅकीटाकी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे 

मुख्य मंदिराच्या परिसरात बंदोबस्त नियोजन निर्भया पथक तैनात करण्यात येणार आहे. यात्रा काळात श्वान पथक डोंगरावर ठेवले जाईल यात्रेत सी सी यंत्रणा द्वारे सर्व फुटेज चित्रीत होईल त्या मुळे घातपाताच्या घटनांना आळा बसेल. यापाहणीवेळी कोडोली पोलीस ठाण्यातील साहाय्य पोलीस निरीक्षक विकास जाधव पोलीस कर्मचारी एम. एल. पाटील शिवाजी बोने विठ्ठल बहीरम तसेच कोडोली पोलीस ठाण्यातील पोलीस  ग्रामस्थ पूजारी व्यापारी दुकानदार उपस्थित होते. 

Web Title: Kolhapur News Jotiba Dongar Chaitra yatra