दख्‍खनच्‍या राजाचा आज चैत्र सोहळा...

निवास मोटे
शनिवार, 31 मार्च 2018

जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी तथा जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेचा उद्या (ता. ३१) मुख्य दिवस आहे. त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.  सायंकाळी पाच वाजता श्री जोतिबा देवाची यात्रेच्या पूर्वसंध्येला आकर्षक बैठी महापूजा बांधण्यात आली. पुजारी बंधूंनी ही पूजा बांधली.

जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी तथा जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेचा उद्या (ता. ३१) मुख्य दिवस आहे. त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.  सायंकाळी पाच वाजता श्री जोतिबा देवाची यात्रेच्या पूर्वसंध्येला आकर्षक बैठी महापूजा बांधण्यात आली. पुजारी बंधूंनी ही पूजा बांधली.

यंदा यात्रा काळात सलग चार दिवस सुटी असल्याने भाविकांची संख्या दहा लाखांवर जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. डोंगरावर सर्वत्र कडक सुरक्षारक्षक व्यवस्था तैनात केली आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते. 

  •  सायंकाळी ५.३० वा. ः भव्य पालखी सोहळा व पालखी मूळमाया यमाई मंदिराकडे गेल्यानंतर कार्यक्रम.
  •  रात्री ८.३० वा. ः पालखी सोहळा मुख्य मंदिर परिसरात.

मुख्य यात्रेसाठी सर्व सासनकाठ्या दाखल

श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी तथा जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथे होणाऱ्या श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेसाठी सर्व सासनकाठ्या दाखल झाल्या आहेत. 

दरम्यान, जोतिबा चैत्र यात्रेत कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी श्‍वानपथक, जलद कृती दल, व्हाईट आर्मी, घातपातविरोधी पथके, अग्निशामक बंब, आदी यंत्रणा प्रशासनाने सज्ज ठेवली आहेत. आज सकाळी ११ वाजता पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी भेट देऊन तयारीची पाहणी केली व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. संपूर्ण गावातून श्‍वानपथकाद्वारे पाहणी केली.

कोपऱ्याकोपऱ्यांवर पोलिस व सुरक्षारक्षक सज्ज ठेवले आहेत. आजच सायंकाळपर्यंत सुमारे दोन लाख भाविकांनी डोंगरावर हजेरी लावली. त्यामुळे यमाई मंदिर परिसर, शासकीय विश्रामगृह परिसर, एसटी स्टॅंड परिसरातील वाहने पार्किंगच्या जागा हाऊसफुल्ल झाल्या. पोहाळे तर्फ आळते, कुशिरे तर्फ ठाणे, वडणगे-निगवे, गिरोली-दानेवाडी या गावचे जोतिबा डोंगराकडे जाणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने आज दिवसभर फुलून गेले.

हलगी-पिपाणीच्या सुरांनी व चांगभलंच्या जयघोषाने डोंगर पठार व गावातील रस्ते दणाणून गेले. कोल्हापुरातील पंचगंगा नदीपासून ते गायमुख तलावमार्गे सासनकाठी घेऊन पंढरपूर, बार्शी, लातूर, सोलापूर या भागातील भाविकांनी अनवाणी पायाने प्रवास केला. आज आलेल्या भाविकांनी चव्हाण तळे परिसर, यमाई बाग परिसर, एसटी स्टॅंड परिसर, पाण्याची टाकी येथे राहण्यासाठी जागा नक्की केल्या.

उन्हाच्या कडाक्‍यामुळे अनेक भाविकांना चक्कर येणे, रक्तदाब वाढणे यासारख्या घटना घडल्या. या भाविकांवर सेंट्रल प्लाझा येथे असणाऱ्या व्हाईट आर्मीच्या वातानुकूलीत रुग्णालयात उपचार करण्यात आले.  

आज सायंकाळी साडेपाच वाजता निमाम पाडळी (जि. सातारा), मौजे विहे (ता. पाटण), किवळ (ता. कऱ्हाड), कसबे डिग्रज (ता. मिरज), कसबा सांगाव (ता. कागल) मनपाडळे, दरवेश पाडळी (ता. हातकणंगले), फाळकेवाडी, विठ्ठलवाडी, सांगलीवाडी यांच्यासह मानाच्या ९६ सासनकाठ्या सवाद्य मिरवणुकीने मूळमाया श्री यमाई मंदिराकडे दाखल झाल्या.

या सर्व सासनकाठ्यांचे स्वागत पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी, अधीक्षक महादेव दिंडे, लक्ष्मण डबाणे, देवसेवक, ग्रामस्थ, पुजारी यांनी केले. त्यांना देवस्थान समितीच्यावतीने मानाचे विडे देण्यात आले. त्यानंतर सासनकाठ्या शासकीय विश्रामगृहमार्गे, नवीन वसाहत शिवाजी पुतळामार्गे मुख्य मंदिराच्या प्रांगणात आल्या. मंदिराभोवती सवाद्य मिरवणुकीने काठ्या नाचवून शिखर दर्शन घेऊन मंदिर परिसरात ठरलेल्या जागी त्या उभ्या करण्यात आल्या. आज भाविकांनी सासनकाठी व शिखरांवर गुलाल-खोबऱ्याची उधळण करण्यासाठी गर्दी गेली. उद्या संपूर्ण डोंगरच गुलालमय होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून शासकीय यंत्रणेने चैत्र यात्रेत खोबरे वाटी उधळण्यास बंदी घातल्याने खोबरे तुकडे करून व्यापाऱ्यांनी विक्रीस ठेवलेले आहेत.

यात्रेत कोणत्याही भाविकांनी खोबरे वाटी उधळू नये, असे आवाहन पन्हाळ्याचे तहसीलदार रामचंद्र चोबे यांनी केले आहे. त्यासाठी डोंगरावर पथकाने तपासणीही केली.

भाविकांच्या सेवेसाठी मुख्य मंदिर परिसर, प्राथमिक शाळा, गायमुख परिसर येथे प्रशासनाने डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर, सनराईज, केखले, आरोग्य केंद्र, सरकारी दवाखाना जोतिबा, प्राथमिक आरोग्य केंद्र पन्हाळा, बोरपाडळे, व्हाईट आर्मी यांची पथके २४ तास सज्ज ठेवली आहेत. दहा रुग्णवाहिकांची व्यवस्था केली असून, तातडीच्या रुग्णांना १०८ मधून कोल्हापुरात उपचाराची सोय केल्याचे सांगण्यात आले.

मंदिरात आज होणारे धार्मिक कार्यक्रम

  •  पहाटे ३ वाजता ः घंटानाद
  •  पहाटे ४ ते ५ वा. ः ‘श्री’ची पाद्यपूजा, काकडआरती मुखमार्जन.
  •  पहाटे ५ ते ६ वा.  ः ‘श्री’ना शासकीय अभिषेक
  •  पन्हाळ्याचे तहसीलदार रामचंद्र चोबे यांच्या हस्ते
  •  सकाळी ६ ते ७ वा. ः पोशाख
  •  सकाळी ८ ते १० वा. ः मंदिर दर्शनासाठी खुले
  •  सकाळी १० ते १२ वा. ः धुपारती व अंगारा
  •  दुपारी १ वा. ः सासनकाठ्यांची भव्य मिरवणूक 
Web Title: Kolhapur News Jotiba Dongar Chaitra Yatra