जोतिबा डोंगर येथे खेट्यांची सांगता; दर्शनासाठी दिड लाख भाविक 

निवास मोटे
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

जोतिबा डोंगर - गुलाल खोबऱ्याची उधळण अन् जोतिबाच्या नावाने चांगभल, यमाईदेवी चोपडाईदेवी काळभैरवाच्या नावाने चांगभलचा जयघोष करीत आज श्री क्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील जोतिबा मंदिरात खेट्यांची भक्तीमय वातावरणात सांगता झाली.

जोतिबा डोंगर - गुलाल खोबऱ्याची उधळण अन् जोतिबाच्या नावाने चांगभल, यमाईदेवी चोपडाईदेवी काळभैरवाच्या नावाने चांगभलचा जयघोष करीत आज श्री क्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील जोतिबा मंदिरात खेट्यांची भक्तीमय वातावरणात सांगता झाली.

आज महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील दिड लाख भाविकांनी जोतिबा देवाचे दर्शन घेतले. माघ पोर्णिमा ते फाल्गुन पौर्णिमेच्या पूर्वी येणाऱ्या रविवारी शेवटचा खेटा करण्याची परंपरा असून यामध्ये कधी चार तर कधी पाच रविवार येतात यंदा चार रविवार आल्याने आज चौथा खेटयालाच खेट्यांची सांगता करण्यात आली. 

चैत्र यात्रा यंदा 31 मार्चला

जोतिबा देवाची चैत्र यात्रा 31 मार्चला असून आठवड्याभरात यात्रेची तयारी सुरू होईल. शासकीय यंत्रणाही यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी बैठका घेणार आहे. 

येत्या गुरुवारी होळी पौर्णिमेचा सण असल्याने कोल्हापूरच्या बहुतांशी भाविकांनी पूजारी लोकांच्या घरी नैवेद्य करण्यासाठी मोठी गर्दी केली. चांगभलचा जयघोष करीत भाविकांनी दर्शनासाठी मंदिराभोवती रांगा लावून पोलीस यंत्रणेस सहकार्य केले  आज मुख्य मंदिरात पाद्यपूजा, काकड आरती व मंगलपाठ झाले.

सकाळी केरबा उपाध्दे, शरद बुरांडे, सुरज उपाध्दे, बंडा उमराणी यांनी केदार कवच, केदार महीमा स्त्रोत्र या विधीचे पठण केले. सकाळी दहा वाजता श्री जोतिबा देवाची सालंकृत महापूजा बांधण्यात आली. दुपारी धुपारती सोहळा झाला. यावेळी भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण अन जोतिबाच्या नावाने चांगभल चा जयघोष केला 

 

 

Web Title: Kolhapur News Jotiba Dongar Kheta Sangata