जोतिबा डोंगर येथे सलग सुट्ट्यांमुळे दर्शनास भाविकांची गर्दी

निवास मोटे
रविवार, 29 एप्रिल 2018

जोतिबा डोंगर - येथे श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक दाखल झाले आहेत. सलग चार दिवस सुट्टी व आज पाैर्णिमा असल्याने दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

जोतिबा डोंगर - येथे श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक दाखल झाले आहेत. सलग चार दिवस सुट्टी व आज पाैर्णिमा असल्याने दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

पर्यटकांसह जोतिबा डोंगरावर आज जिकडे तिकडे गुलालात न्हावून निघालेले भाविक दिसत होते. ठाकरे मिटके गल्लीपर्यंत व मुख्य मंदिराच्या भोवती भर उन्हात दिवसभर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. शिखरावर गुलाल खोबऱ्याची उधळण सुरू होती. जोतिबाच्या नावाने चांगभलच्या जयघोषाने संपूर्ण डोंगर भक्तीमय झाला आहे.  कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून डोंगरावर सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे 

Web Title: Kolhapur News Jotiba Dongar tourist

टॅग्स