गहिवरला कारागृह: बाबा तुम्ही कधी घरी येणार...

kalamba central jail
kalamba central jail

गहिवरला कळंबा कारागृह ; शिक्षाबंदी व त्यांच्या मुलांची गळाभेट

कोल्हापूर: बाबा तुम्ही कधी घरी येणार, मला तुमची आठवण येते, घरी आई खूप रडते ओ... लहान मुलांच्या या प्रश्‍नाला निरुत्तर झालेले बंदीजन. हतबल झालेल्या वडीलांना पाहून मुलांच्या डोळ्यातून वाहणारे पाणी असे गहिवर आणणारं दृष्य आज (शुक्रवार) कळंबा कारागृहाने अनुभवले. निमित्त होत शिक्षाबंदी व त्यांच्या मुलांची गळाभेट कार्यक्रमाचे.

कळंबा कारागृह प्रशासनाने शिक्षाबंदी व त्यांच्या मुलांच्या गळाभेटीचा कार्यक्रम आज घेतला. कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी यासाठी पुढाकार घेतला. दिर्घकालीन शिक्षा भोगणाऱ्या बंदींसाठी हा उपक्रम घेण्यात आला. भेटीसाठी 212 पुरूष तर 8 महिला बंदींनी नावनोंदणी केली होती. सकाळी साडेआठ पासून बंदीचे नातेवाईक एकूण 417 मुलांना घेऊन कारागृहात आली होती. 0 ते 2 वर्षे पर्यंतच्या मुलांसोबत त्यांच्या एका पालकांला आत सोडण्यात येत होते. 2 ते 16 वयोगटातील मुलांना फक्त एकट्यालाच भेटण्यासाठी आत सोडण्यात आले. भेटीला येणाऱ्या लहान मुलांचा विचार करून बंदीना साध्या गणवेशात भेटण्याची मुभा प्रशासनाने दिली होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास गळाभेटीच्या कार्यक्रमास सुरवात झाली.

कारागृहात मुलांच्या गर्दीतून आपले पाल्य शोधण्याची घाई बंदीजणाकडून सुरू होती तर दुसरीकडे पाल्य हतातील ओळखपत्र घेऊन आपले आई-बाबा कोठे भेटतात याची आतुरतेने वाट पाहत होते. मुलाचे नाव पुकारल्या पुकारल्या बंदीजन धावत मंडपात येत होता. आपल्या पाल्याला उचलवून घेऊ, त्याच्या तोंडावर मायेचा हात फिरवून त्याला मिठ्ठी मारू लागले. हतातील पिशवीतील खाऊ बाटलीतील सरबत हाताने मुलांच्या तोंडात भरवू लागले. घरापासून दूर गेलेल्या वडीलांकडून मिळालेले प्रेम पाहून मुलांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या धारा पाहून बंदीजनाही हुंदका आवरता येत नव्हता. मुलांचे निकालपत्र पाहून आता पुढच्या वर्षी वर्गात पहिला नंबर काढायचा बाळा असे प्रोत्साहन बंदीजनांकडून दिले जात होते. तसेच "बाळांनो मी एक चूक केली आहे. देवाने मला त्याची शिक्षा दिली आहे. मात्र, तुम्ही शिकून मोठे ऑफीसर व्हा, घरी आईची काळजी घ्या' असा सल्ला त्यांच्याकडून मुलांना दिला जात होता. प्रशासनाकडून बंदीसह त्यांच्या मुलांना भोजनाची सोय केली होती. त्यामुळे मुलांबरोबर एकाच ताटात भोजन घेण्याचा त्यांना हाताने घास भरविण्याचा आनंदही बंदींना यामुळे घेता आला. मुलांच्या भेटीने तृप्त झालेल्या बंदीनी कारागृह प्रशासनाचे आभार मानले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कारागृह अधीक्षक शरद शेळके, वरिष्ठ तुरुंगाधिकारी चंद्राकांत आवळे, एच. एल. आडे, तुरुंगाधिकारी यु. एन. गायकवाड, सतिश गायकवाड,

भेट पेनाची सल्ला शिक्षणाचा...
कारागृहातील बंदी शिवाप्पा हिरमनी हा आचारीचे काम करतो. भेटीला आलेल्या तीन मुलांना त्याने पेन भेट दिला. हा साधा पेन नव्हे तर या पेनाच्या आधारे शिकून खूप खूप मोठे व्हा... पोरांनो असे तो सांगत होता.

पोरगी पोलिस ऑफीसर बनणार म्हणतीय...
कारागृहात नातेवाईकासह बंदीजणाची शिक्षा भोगणारी तानीया शेख हिची मुलगी सहा वर्षाची झाली. पाच वर्षे ती आई सोबत कारागृहात राहत होती. मात्र सध्या ती बाल संकुलात राहते. शिक्षण घेते. ती आज आईला भेटायला आली. आई तू घाबरू नको मी मोठी पोलिस ऑफीसर बनते आणि तुला येथून बाहेर काढते... अशा चिमुकलीच्या तोंडून बाहेर पडलेले वाक्‍य पाहून शेख यांचे डोळे पाणावले. त्या इतर बंदींना पोरगी पोलिस ऑफीसर बनणार म्हणतीय असे कौतुकाने सांगत होत्या.

ताज्या बातम्याः

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com