केदारलिंग बेकरीचे मालक राजाराम खाडे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

कोल्हापूर - येथील केदारलिंग बेकरीचे मालक राजाराम दत्तोबा खाडे (वय ६७) यांचे आज आजाराने निधन झाले.

कोल्हापूर - येथील केदारलिंग बेकरीचे मालक राजाराम दत्तोबा खाडे (वय ६७) यांचे आज आजाराने निधन झाले.

दिवंगत वडील दत्तोबा कुशाप्पा खाडे यांनी सुरू केलेल्या केदारलिंग बेकरी या व्यवसायाचा विस्तार राजाराम यांनी  केला. ते करताना कित्येक कुटुंबांचा आधारवड ते होतेच शिवाय लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष, बेकरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष, मॉर्निंग ग्रुपमध्ये सहभाग अशा उपक्रमामध्ये ते सहभागी होत. दर रविवारी रंकाळा बसस्थानकासमोर त्यांच्या वतीने २०० लोकांना जेवण दिले जात होते. दोन्ही हात नसलेल्या माऊली या मुलीला दत्तक घेण्याबरोबरच पूरग्रस्तांसाठी मदतीमध्ये ते नेहमीच पुढाकार घेत. याशिवाय अपंग, अंधांना कामावर घेताना प्राधान्य दिले. दरवर्षी कित्येक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, ड्रेसचे वाटप करत होते. विविध पुरस्कारांनी सन्मानित राजाराम खाडे यांनी कित्येक मंडळांनाही वेळोवेळी आर्थिक मदत केली. श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या सुवर्ण पालखीसाठी यथायोग्य मदतही त्यांनी केली होती.

दरम्यान, सकाळी शिवाजी पेठ येथील निवासस्थानापासून त्यांची सजवलेल्या ट्रक्टरमधून अंत्ययात्रा काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. पंचगंगा स्मशानभूमीमध्ये आदरांजपलीपर भाषणे होऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे भाऊ, बहीण, पत्नी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. ऑल इंडिया बेकर्स असोसिएशनचे सचिव सत्यजित व सुशांत यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १३) सकाळी नऊ वाजता आहे.

Web Title: Kolhapur News Kedarling Bekary owner Rajaram Khade no more