रमजानमध्ये ‘खजुराचा’ गोडवा

रमजानमध्ये ‘खजुराचा’ गोडवा

कोल्हापूर - रमजानचा पवित्र महिना सुरू असून, बाजारपेठ खाद्यपदार्थांनी सजली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे असते ते खजूर. देशभरात सुमारे १३० हून अधिक प्रकारचे खजूर येतात. त्यापैकी कोल्हापूरच्या बाजारपेठेत सुमारे पन्नासहून अधिक प्रकारचे खजूर आज उपलब्ध आहेत. ७० रुपये किलो दरापासून बाजारपेठेमध्ये खजूर उपलब्ध आहेत.  

खजुराचे महत्त्व...

खजूर हे शरीरासाठी आवश्‍यक जीवनसत्व, खनिजे, आणि फायबर समृद्ध असते. यामध्ये तेल, कॅल्शिअम, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅगनीज, कॉपर आणि मॅग्नेशियम असे घटक असतात. 

रमजान आणि खजूर...
विविध जीवनसत्त्वांचा खजिना असलेले हे खजूर उपवासाच्या महिन्यात भारतामध्ये अधिक पाहायला मिळतात.  रमजानचा पवित्र महिना मुस्लिम धर्मीय अधिक काटेकोरपणे पाळतात. महिन्यांमध्ये उपवास केला जातो सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत काहीही खाल्ले, पिले जात नाही यामुळे दिवसभरात शरीराला आवश्‍यक असणाऱ्या पोषक तत्त्वांची गरज भासते ही पोषकतत्त्वे मिळवून देण्याचे काम खजूर करते. 
यामुळे खजूर खाऊनच उपवास सोडला जातो.  
शंभर ग्राम खजूर २८२ कॅलरीज देतात याचा उपवासादरम्यान फायदा होतो. 

येथून येतात खजूर...
इजिप्त, इराण, अल्जेरिया, सौदी अरेबिया, युएई, इराक, सुदान, ओमान, ट्युनेशिया हे खजूर उत्पन्न करणारे प्रमुख देश आहेत. यापैकी इराण, सौदी, दुबई या आखाती देशांतून, तर राजस्थान व गुजरातमधूनही खजूर कोल्हापूर बाजारपेठेत येतात. खजुरांच्या प्रतीनुसार दर निश्‍चित होतात.

खजुराची किंमत ही दर्जावरून ठरते. जायदी, फरद, टूनेशिया- ब्रॅंचेस, आयवी, कपकप, बुमन, मगदूल, अजवा, मेकदोल, मुबरोक या प्रकारचे खजूर उपलब्ध आहेत. ७० रुपये किलो ते ३००० रुपये किलो दर आहे. कोल्हापूरमध्ये होलसेलला रोज सुमारे दीडशे ते दोनशे किलो खजुरांची विक्री रमजान महिन्यात होते. 
-चेतन शहा, व्यापारी

दिवसभर उपवास केल्याने शरीरामध्ये थकवा आलेला असतो. भुकेबरोबरच तहानदेखील असते. यामुळे शरीराला तत्काळ ऊर्जा देण्याचे काम खजूर करते. या मुळेच खजुराचा समावेश मुख्य आहारामध्ये केला असतो.  
-अब्दुलवाहिद कुरेशी, बडीमशीदप्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com