कोल्हापूरात सर्किट बेंचसाठी शंभर कोटीची तरतुद येत्या अर्थसंकल्पात - मुख्यमंत्री

लुमाकांत नलावडे
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरात होण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत अकराशे कोटीच्या तरतूदीपैकी शंभर कोटींची ठोक तरतूद येत्या अर्थसंकल्पात करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे, अशी माहिती  खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड प्रशांत शिंदे यांनी दिली आहे.

या बैठकीत मुंबई उच्च न्यायालयाकडील सर्किट बेंच फक्त कोल्हापूरला द्यावे अशा आशयाचे पत्र तातडीने हायकोर्टाला देण्याचे आदेश संबंधीत अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच शेंडापार्क जवळील 75 एकर  जागा सर्किट बेंचसाठी आरक्षित करण्यात आली आहे. ते देण्यासंदर्भातही प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी मान्य केले आहे, असेही शिंदे यांनी सांगितले. 

या निर्णयामुळे सर्व पक्षीय नागरी खंडपीठ समिती आणि खंडपीठ कृती समिती यांची मुख्यमंत्र्यासोबत त्यांच्या दालनात झालेली बैठक यशस्वी झाली आहे. ज्येष्ठ नेते प्रा.एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. 

Web Title: Kolhapur News Khandpeeth issue