मूळ नस्तीत खाडाखोड, दोन अधिकारी निलंबित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

कोल्हापूर - एका ठेकेदाराची आठ लाखांची बयाणा रक्कम परत देण्यासाठी महापालिकेच्या मूळ नस्तीत खाडाखोड केल्याप्रकरणी महापालिकेचे शाखा अभियंता बी. जी. कुराडे आणि लेखाधिकारी नंदकुमार चौगुले यांना निलंबित केले आहे. याबाबतची माहिती आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

पाणीपुरवठा विभागातील पाईपलाईनच्या कामात हा गैरप्रकार घडला होता. लोकलेखा समितीने याबाबत कारवाई करा, अशा सूचना आयुक्तांना दिल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई केली आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने २००९ मध्ये डीआयके पाईपलाईन टाकण्याच्या कामाची निविदा प्रसिध्द केली होती. याकामासाठी एका कंपनीने निविदाही भरली हेती. पण संबधित कंपनीला सहा महिन्याच्या कालावधीत पाइप मिळाल्या नाहीत. त्यामुळे या कंपनीची निविदा रद्द झाली. निविदा भरताना कंपनीने आठ लाखाची बयाणा रक्कम भरली होती. नियमाप्रमाणे महापालिकेने बयाणा रक्कम जप्त करायला हवी होती. पण ही रक्कम संबधित ठेकेदाराला इमानेइतबारे परत देण्याचे काम या दोन्ही अधिकाऱ्यांनी  केले. हे प्रकरण महापालिकेत लेखापरीक्षकांसह कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ध्यानातही आले नाही. त्यानंतर या प्रकरणात भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक --- यांच्या स्थानिक अहवालात ही बयाणा रक्कम जप्त न केल्याबद्दल आक्षेप नोंदविला होता. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असा आदेश दिला होता.

राज्याच्या नगरविकास विभागानेही याबाबत कारवाई करण्याची सूचना आयुक्तांना दिली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महापालिकेत समिती नेमण्यात आली. या समितीने तपास करताना महापालिकेच्या मूळ नस्तीत खाडोखोड झाल्याचे निदर्शनास आले. बयाना रक्कम परत देण्याची आयुक्तांची शिफारस नसताना तसा मजकूर लिहीला होता. शाखा अभियंता बी.जी.कुऱ्हाडे यांच्या हस्ताक्षरात हा मजकूर लिहिला होता. 

पोलिसात फिर्याद
प्रकरण उघडकीस आल्यानंतर मूळ नस्तीत खाडोखोड झाल्याचा नंदकुमार चौगुले व कुऱ्हाडे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. याप्रकरणी महापालिकेचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी पोलिसातही फिर्याद दिली आहे. तसेच या दोघानांही आज निलंबीत केले आहे.अशी माहीती आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले.

Web Title: kolhapur news kmc officer

टॅग्स