महापालिकेच्या वाहनाला मिळणार दुसरा क्रमांक 

डॅनियल काळे
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - एकाच क्रमांकाची दोन वाहने कोल्हापूर शहरात फिरत असल्याचे प्रकरण "सकाळ'ने उघडकीस आणल्यानंतर अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. एक वाहन महापालिका आयुक्तांच्या नावे, तर दुसरे वाहन महावितरण उपअभियंता गीता काळे यांच्या नावे होते. दोन्ही वाहनांचे स्वतंत्र आर.सी. बुकही प्रादेशिक परिवहन विभागाने आदा केले होते. पण वाहन क्रमांक हा युनिक असतो. त्यामुळे आता महापालिकेच्या आयुक्तांच्या वाहनाचा नंबर रद्द करावा लागणार आहे. एमएच 09 एजी 6000 हा क्रमांक आता महावितरणच्या उपअभियंता गीता काळे यांच्याकडे कायम राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोल्हापूर - एकाच क्रमांकाची दोन वाहने कोल्हापूर शहरात फिरत असल्याचे प्रकरण "सकाळ'ने उघडकीस आणल्यानंतर अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. एक वाहन महापालिका आयुक्तांच्या नावे, तर दुसरे वाहन महावितरण उपअभियंता गीता काळे यांच्या नावे होते. दोन्ही वाहनांचे स्वतंत्र आर.सी. बुकही प्रादेशिक परिवहन विभागाने आदा केले होते. पण वाहन क्रमांक हा युनिक असतो. त्यामुळे आता महापालिकेच्या आयुक्तांच्या वाहनाचा नंबर रद्द करावा लागणार आहे. एमएच 09 एजी 6000 हा क्रमांक आता महावितरणच्या उपअभियंता गीता काळे यांच्याकडे कायम राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या नावे असणाऱ्या मांझा गाडीला दुसरा क्रमांक घ्यावा लागणार आहे. आकर्षक वाहन क्रमांकासाठीचे पैसे न भरणे आणि अभिलेख पूर्ण न करणे या दोन कारणांस्तव महापालिकेचा हा क्रमांक जाणार आहे. 

कोल्हापुरात एकाच क्रमांकाची दोन वाहने फिरत असल्याचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. एजी सीरियलमधली ही वाहने होती. याबाबत "सकाळ'ने पाठपुरावा केल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागातून दोन वाहनांना एकच क्रमांक दिल्याचे स्पष्ट झाले. महापालिका उपायुक्तांसाठी महापालिकेने इंडिगो मांझा ही गाडी 2012 मध्ये खरेदी केली होती. यासाठी एमएच 09 एजी 6000 हा नंबर घेण्यात आला होता. पण या नंबरसाठी आवश्‍यक असणारे अभिलेख महापालिकेने पूर्ण केले नाहीत. प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमानुसार आकर्षक क्रमांकासाठी महापालिकेलाही सर्वसामान्यांप्रमाणे शुल्क भरावेच लागते. महापालिकेला यामधून सूट नाही. महापालिकेने मात्र कोणत्याही प्रकारचे शुल्क भरले नव्हते. त्यामुळे महापालिकेचा एमएच 09 एजी 6000 या क्रमांकासाठीचा अभिलेख पूर्ण झाला नाही. परिणामी प्रादेशिक परिवहन विभागाच्या संगणकप्रणालीवर हा क्रमांक रिकामाच असल्याचे दिसत होते. 

दुसरा क्रमांक महावितरणच्या उपभियंता गीता काळे यांचे नावे असणाऱ्या अमेझ या वाहनाला सप्टेंबर 2015 मध्ये देण्यात आला होता. या क्रमांकासाठी गीता काळे यांनी आकर्षक क्रमांकासाठीचे 45 हजार रुपयांचे शुल्कही प्रादेशिक परिवहन विभागाकडे भरले आहे. 

आरटीओने घेतला निर्णय 
एकच क्रमांक दोन वाहनांना दिल्याची चूक प्रादेशिक परिवहन विभागाच्या लक्षात येताच या विभागाने दोन्ही वाहन मालकांना पत्र पाठवून नंबर बदलून घ्या, अशी विनंती केली होती. पण यामधून माघार घ्यायला कोणीच तयार नसल्याने प्रादेशिक परिवहन विभागालाच निर्णय घेणे भाग पडले आहे. याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, एमएच 09 एजी 6000 हा आकर्षक वाहन क्रमांक आहे. त्यासाठी महापालिकेने शुल्क भरणे गरजेचे होते. तथापी महापालिकेने हे शुल्क भरले नसल्याने आता महापालिकेला हा नंबर गमवावा लागणार आहे. गीता काळे यांच्याकडे हा 6000 क्रमांक राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: kolhapur news kmc RTO