कोल्हापूर मुंबई विमानसेवा सुरु

लुमाकांत नलवडे
मंगळवार, 17 एप्रिल 2018

कोल्हापूर - तब्बल सहा वर्षे खंडित झालेली कोल्हापूर मुंबई विमानसेवा आज पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली. खासदार धनंजय महाडिक हे जिल्ह्यातील 18 उद्योजकांना घेऊन कोल्हापुरात दाखल झाले.  याच विमानाने कोल्हापुरातील कचरा वेचणाऱ्या महिला, दिव्यांग, अनाथ, शेतकरी असे आठ प्रवासी मुंबईला रवाना झाले

कोल्हापूर - तब्बल सहा वर्षे खंडित झालेली कोल्हापूर मुंबई विमानसेवा आज पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली. खासदार धनंजय महाडिक हे जिल्ह्यातील 18 उद्योजकांना घेऊन कोल्हापुरात दाखल झाले.  याच विमानाने कोल्हापुरातील कचरा वेचणाऱ्या महिला, दिव्यांग, अनाथ, शेतकरी, पत्रकार या आठ प्रवाशांसह अठरा प्रवाशी मुंबईला रवाना झाले.

कोल्हापुरात आज विमानाने आलेल्या प्रवाशाचे स्वागत खासदार संभाजीराजे छत्रपती, अरुंधती महाडिक यांनी गुलाबपुष्प देऊन केले. आठवड्यातून तीन दिवस चालणारी ही सेवा ए डेक्कन कंपनीकडून केंद्र शासनाच्या उडान योजनेअंतर्गत सुरू झाली आहे. 18 पैकी पहिल्या नऊ प्रवाशांना प्रवासात सुट मिळाली. त्यांना केवळ 1970 रुपये इतका तिकिटाचा दर द्यावा लागला.  

विमानसेवा सुरु झाली आहे. आता शिवाजी पुलाचा प्रश्न मार्गी लावू.

-  संभाजीराजे, खासदार 

कोल्हापूर विमान सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन निवडणुकीत दिले होते. ते आज पूर्ण झाले. ही सेवा अखंड सुरू राहण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत.

-  धनंजय महाडिक, खासदार

कोल्हापूर मुंबई विमान सेवेचा लाभ आजपासून सुरू झाल्यामुळे कोल्हापुरातील पर्यटन उद्योगाला चालना मिळणार आहे. 

Web Title: Kolhapur News Kolhapur-Mumbai air service starts