बारावी निकालात कोल्हापूर विभाग राज्यात दुसरा

संभाजी गंडमाळे
बुधवार, 30 मे 2018

कोल्हापूर - बारावी निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली. मुलांच्या तुलनेत 10. 73 टक्के अधिक उत्तीर्णतेचे प्रमाण मुलींचे असून कोल्हापूर विभागाचा निकाल 91 टक्के लागला. विभागांतर्गत तीन जिल्ह्यात कोल्हापूरचा निकाल सर्वाधिक 91. 50 टक्के तर त्याखालोखाल सातारा जिल्ह्याचा 91. 14 आणि सांगली जिल्ह्याचा 90. 12 टक्के निकाल लागला. 

राज्यातील एकूण नऊ विभागात कोल्हापूरचा दुसरा क्रमांक यंदाही कायम राहिला आहे. सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना बारा जूनला विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि इतर साहित्याचे वाटप होणार असून त्याच दिवशी दुपारी तीनला गुणपत्रिकांचे वितरण विद्यार्थ्यांना होईल. 

विभागाचा ऑनलाईन निकाल दुपारी एक वाजता जाहीर झाला. विभागात एकूण एक लाख 25 हजार 648 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी एक लाख 14 हजार 342 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण 154 केंद्रावर परीक्षा झाली होती. एकूण 73 हजार 244 मुलांनी तर 56 हजार 480 मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी अनुक्रमे 61 हजार 861 मुले तर 53 हजार 763 मुली उत्तीर्ण झाल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत 0. 4 टक्के इतकी निकालात घसरण झाली असून उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीची मागणी विद्यार्थ्यांना उद्या (ता.31) पासून 19 जूनपर्यंत मंडळाकडे करता येणार आहे. गुणपडताळणीसाठी नऊ जूनपर्यंत अर्ज सादर करता येतील, अशी माहिती विभागीय सचिव तथा प्रभारी अध्यक्ष पुष्पलता पवार यांनी दिली. यावेळी शिक्षण उपनिरीक्षक डी. एस. पोवार, सहसचिव टी. एल. मोळे, सांगलीचे एस. एस. बस्तवडे आदी उपस्थित होते. 

Web Title: Kolhapur News Kolhapur section second in HSC Result