कोल्हापूरात बंद विरोधात हिंदुत्ववादी संघटना रस्तावर

निखिल पंडितराव
बुधवार, 3 जानेवारी 2018

कोल्हापूर - येथे कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला विरोध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरल्या आहेत. शिवसेनेचे आमदार राजेश क्षिरसागरही यात सहभागी झाले आहेत.

कोल्हापूर - येथे कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला विरोध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. शिवसेनेचे आमदार राजेश क्षिरसागरही यात सहभागी झाले आहेत.

दरम्यान कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले आहे. हिंदुत्ववादी संघटना पूर्ण ताकदीनिशी या बंदमध्ये विरोध करण्यासाठी उतरल्यामुळे शहरात प्रचंड मोठा तणाव झाला आहे. दसरा चौकात संतप्त जमावाने दगडफेक केली. यामध्ये चाैकातील तरूण भारतच्या कार्यालयावरही दगडफेक झाली. 

गुजरी आणि मादा रोड परिसरात हिंदुत्वादी संघटनांचे सर्व प्रतिनिधी तसेच शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर देखील आता यामध्ये उतरले आहेत. यामुळे हिंदुत्ववादी विरुद्ध दलित संघटना असे चित्र कोल्हापुरात तयार झाल्याचे दिसत आहे . पोलिसांनी अत्यंत संयमी भूमिका ठेवली आहे .

 

Web Title: Kolhapur News Koregaon Bhima incident issue