दसऱयाच्या दिवशी ऊस तोड मजूराचा दुर्देवी मृत्यू

बाळासाहेब कांबळे
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

हुपरी (जि. कोल्हापूर): ट्रॉलीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात काळूराम तुळशीराम चव्हाण (वय ३५ रा. धारावती तांडा, ता. परळी जि. बीड) हा ऊस तोड मजूर ठार झाला. कोल्हापूर वेस रस्त्यावर येथील पद्मासना पेट्रोल पंपा समोर हा अपघात घडला. घटनेची नोंद हूपरी पोलिसात झाली असून, ऐन दसर्‍या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

साखर कारखान्याच्या ऊस तोडणीसाठी इंगळी (ता. हातकणंगले) येथील तानाजी शंकर पाटील यांनी बीड जिल्ह्यातील मजुरांची टोळी ठरवली आहे. या टोळीतील १५ ते २० मजुरांचे शुक्रवारी (ता. 29) रात्री इंगळी गावी आगमन झाले. आज (शनिवार) सकाळी सर्व जण ट्रॅक्टर (क्र. एम एच ०९ बी बी ३२१८), ट्रॉली (क्र. एम एच ०९ बी पी ७३७६ व ७३७७) मधुन हुपरीकडे कारखाना कार्यस्थळावर जात होते. येथील पद्मासना पेट्रोल पंपा जवळ सर्व जण लघुशंकेसाठी थांबून पुन्हा निघाले. त्यावेळी ट्रॉली मध्ये चढण्याच्या प्रयत्नात असताना ट्रॅक्टर ट्रॉली सुरु होऊन पुढे गेल्याने काळूराम चव्हाण यास ट्रॉलीची जोरदार धडक बसली. कपाळ व डोक्यावर जोराचा आघात झाल्याने काळुराम जागीच कोसळले. उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. देविदास तुळशिराम चव्हाण यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. सहायक पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.

घटनास्थळी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर जमलेल्या काळूराम याच्या कुटूबियांनी तसेच सहकार्‍यांनी केलेला आक्रोश अनेकांचे काळीज हेलावून गेला.

Web Title: kolhapur news labor of sugar cane dead in accident