यंत्रमाग कामगार महिलेचा खून

राजेंद्र होळकर
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

इचलकरंजी - उसने घेतलेले सुमारे दोन लाख रु. परत देण्यासाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा खून केल्याची घटना उघडकीस आली. छाया रवींद्र मस्के (रा. शेळके मळा) असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी शशिकांत भाऊ भोसले, प्रकाश वसंत कोकरे (शेळके मळा) यांना ताब्यात घेतले.

इचलकरंजी - उसने घेतलेले सुमारे दोन लाख रु. परत देण्यासाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा खून केल्याची घटना उघडकीस आली. छाया रवींद्र मस्के (रा. शेळके मळा) असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी शशिकांत भाऊ भोसले, प्रकाश वसंत कोकरे (शेळके मळा) यांना ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शहाजी निकम, पोलिस निरीक्षक सतीश पवार यांच्या पथकाने त्यांना गजाआड केले. युवराज शेळके पसार झाला आहे.

संशयित मारेकऱ्यांनी छाया यांचा मृतदेह अंकली (रायबाग) पुलावरून कृष्णा नदीत फेकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आज सकाळपासून अंकली ते मायाक्का चिंचणी परिसरात मृतदेहाचा शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. येथील शेळके मळा, लक्ष्मी मंदिराजवळ छाया रवींद्र मस्के कुटुंबीयासह राहत होती. ती यंत्रमाग कारखान्यात कांड्या भरण्याचे काम करीत होती. शेजारी शशिकांत भोसले याने त्यांच्याकडून दोन लाख रुपये हातउसने घेतले होते.

छाया यांनी पैशासाठी तगादा लावला होता. त्याला वैतागून शशिकांतने मित्रांच्या मदतीने त्यांच्या खुनाचा कट केला. ९ ऑक्‍टोबरला शशिकांतने पैसे देण्याचा बहाणा करून शेळके मळ्यातील भूत बंगला नावाने ओळखल्या जाणाऱ्या अर्धवट इमारतीमध्ये छाया यांचा शशिकांतसह मित्र प्रकाश कोकरे, युवराज शेळके यांनी खून केला. मृतदेह अंकली (रायबाग) येथील कृष्णा नदी पुलावरून नदीपात्रात फेकून दिला.

रात्री उशिरापर्यंत छाया घरी न आल्यामुळे नातेवाईकांनी शोध घेतला. याबाबत त्या बेपत्ता झाल्याची जावई राजू बजरंग चावरे याने तक्रार दिली.
 छाया यांचा घातपात झाल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी शेळके मळ्यातील शशिकांत भोसले, युवराज शेळके, प्रकाश कोकरे यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी खून केल्याचे उघड झाले. 

मृतदेहाची खांडोळी
छाया मस्के हिच्यावर विळ्याने वार करून शशिकांत भोसले, प्रकाश कोकरे व युवराज शेळके या तिघांनी अत्यंत शांत डोक्‍याने खून केला. त्यानंतर मृतदेहाची खांडोळी करून तो पोत्यात भरला. त्यानंतर त्याची पुढील विल्हेवाट लावल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकाराने शेळके मळा परिसर हादरला आहे.

Web Title: Kolhapur News labor woman murder

टॅग्स