जमिनीसाठी घरात घुसून जीवे मारण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

कोल्हापूर - जमिनीचा हक्क सोडावा, यासाठी घरात घुसून दहशत माजवण्याबरोबर एकास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातील पोलिस अधिकाऱ्यासह नऊ जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील आठ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात शिवाजी पेठेतील माजी नगरसेवकाचेही नाव पुढे आले आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे; मात्र तो अद्याप हाती लागलेला नाही, असे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले. 

कोल्हापूर - जमिनीचा हक्क सोडावा, यासाठी घरात घुसून दहशत माजवण्याबरोबर एकास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातील पोलिस अधिकाऱ्यासह नऊ जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील आठ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात शिवाजी पेठेतील माजी नगरसेवकाचेही नाव पुढे आले आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे; मात्र तो अद्याप हाती लागलेला नाही, असे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले. 

अटक केलेल्या संशयितांमध्ये प्रशांत दिगंबर निळकंठ (वय ४५, जैन मंदिरजवळ, शनिवार पेठ), तानाजी आनंदराव जाधव (३०, रा. हनुमाननगर पाचगाव), रविराज भरत चौगुले (३३, रा. शिवाजी पेठ), स्वप्नील संजय चौगुले (३१, रा. फिरंगाई गल्ली, शिवाजी पेठ), बंडू प्रल्हाद लोंढे (२९, रा. गंजीमाळ, शिवाजी पेठ), प्रणीत किरण हिंगमिरे (२१, रा. पंढरपूर) आणि बाळकृष्ण भैरू डावरे (३६, रा. खरी कॉर्नर) आणि पकंज गजानन बोळाज (२५, रा. बोळाज गल्ली, गावभाग, सांगली) आदींचा समावेश आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः दिलीप मारुती पाटील (४१) शिवशक्ती हेरिटेज, ताराबाई पार्क येथे राहतात. त्यांची भुदरगडजवळील बाळेघोल येथे जमीन आहे.

शिवाजी पेठेतील एका नगरसेवकाच्या बहिणीचे कुटुंबीय आणि दिलीप पाटील यांच्यात जमिनीवरून वाद आहे. माजी नगरसवेकाच्या बहिणीचा पती हंबीराव पाटील पुण्यात सहायक फौजदार आहे. हंबीराव पाटील, त्याची पत्नी व त्याच्या सात साथीदारांनी दिलीप पाटील यांचे घर, मोबाईल क्रमांक शोधून काढला. ते सर्व जण १४ जूनला पाटील यांच्या ताराबाई पार्क येथील घरात गेले. त्या सर्वांनी बाळेघोल येथील जमिनीचा हक्क सोड नाहीतर तुला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर वारंवार फोन करून व संदेश पाठवून धमकी देत होते. खरी कॉर्नर येथे बोलवून दम दिला होता. अखेरीस कंटाळून दिलीप पाटील यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी सांगितले, की सर्व नऊ संशयित त्या माजी नगरसेवकाच्या सांगण्यावरून दमदाटी करण्याचा प्रकार करत असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. पाटील यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयित सहायक फौजदार हंबीराव गोविंद पाटील, त्यांची पत्नी व सात साथीदारांवर कलम १४३, १४७, १४९, ४५२, ५०४, ५०६, १२० (ब) व मुंबई पोलिस अधिनियम १३५, ३७ (१) अन्वये गुन्हा दाखल केला.  
गुन्हा दाखल झालेल्यांपैकी सात संशयितांना अटक केली आहे. संशयित हंबीराव पाटीलचा शोध सुरू आहे. त्याचबरोबर त्या माजी नगरसेवकाचीही पोलिस चौकशी करणार आहेत. त्यासाठी त्याच्या घराकडे पोलिसाही जावून आले; मात्र तो सापडला नाही. दरम्यान, अटक केलेल्या संशयितांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. 

माजी नगरसेवकाविरोधात पुराव्यांचा शोध सुरू
संशयितांनी माजी नगरसेवकाच्या सांगण्यावरूनच दिलीप पाटील यांना दम दिल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगाने संशयितापैकी कोणाला त्याने मोबाईलवरून किंवा संदेश पाठवून हे कृत्य करण्यास सांगितले, याबाबतचे पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: Kolhapur News Land issue