आंबा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

आंबा - आळतूर धनगरवाड्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासरू ठार झाले. सोमवारी रात्री वाड्यावरील जोतिबा रामू डफडे यांच्या जनावरांच्या गोठ्यात ही घटना घडली. 

आंबा - आळतूर धनगरवाड्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासरू ठार झाले. सोमवारी रात्री वाड्यावरील जोतिबा रामू डफडे यांच्या जनावरांच्या गोठ्यात ही घटना घडली. 

दोन दिवसापूर्वी याच वाड्यावरील गणपती ठकू झोरे यांच्या एका शेळीचा फडशाही बिबट्याने पाडला होता. बिबट्याने पंधरवड्यात लोळाणे व निनाई परळे पैकी पोवारवाडी येथील तीन शेतकऱ्यांच्या सात बकऱ्यांचा फडशा पाडला आहे. 

लोळाणे, वाकोली, निनाई परळे, आळतूर, करूंगळे पाठोपाठ जंगलव्याप्त असलेल्या आळतूर, पुसार्ळे व कोतोली धनगरवाड्यावर बिबट्याने मोर्चा वळविल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी रानगवे ऊस व मक्याची नासधूस करत असल्याने शेतकरी रात्र जागून काढत असतानाच बिबट्याचा वावराने या भागातील शेतकऱ्यांमध्ये नवे संकट उभे राहिले आहे.

Web Title: Kolhapur News Leopard seen in Amba region

टॅग्स