शाळांतील अंतर तपासण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सुचना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

कोल्हापूर - कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयास गावागावांतून होत असलेला विरोध पाहता ज्या शाळा बंद होणार आहेत, त्यांच्यातील अंतर तपासण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली. शाळा बंदविरोधात संतप्त प्रतिक्रिया पाहता अंतर तपासण्याच्या निर्णयामुळे प्रक्रिया रेंगाळण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील १ हजार ३१४, कोल्हापूर विभागातील ४६३ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ३४ शाळा शासनाच्या निर्णयामुळे बंद होणार होत्या. शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असणाऱ्या डोंगरी दुर्गम भागातील मुलांसाठी वाड्या-वस्त्यांवर शाळा सुरू केल्या.

दृष्टिक्षेपात बंद होणाऱ्या शाळा

  •  राज्यात ५ हजार शाळा बंदचा निर्णय 

  •  पहिल्या टप्प्यात १३१४ शाळा

  •  कोल्हापूर विभागात ४६३ शाळा

  •  जिल्ह्यात ३४ शाळा

वस्तीशाळांबरोबरच एक किलोमीटर परिसरात प्राथमिक शिक्षणाची सोय झाली; मात्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने गुणवत्ता व पटसंख्या घसरल्याचे कारण पुढे करत राज्यातील दहा पटापर्यंतच्या सरसकट सुमारे पाच हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात १ हजार ३१४ शाळा बंद करण्याबाबत जिल्हा परिषदांना आदेश दिले. महाराष्ट्रातील डोंगरी, दुर्गम भागातील तसेच वाड्या-वस्त्यांवरील शाळांचा विचार न करता शासनाने हा सरसकट निर्णय घेतल्याने त्याला विरोध सुरू झाला. 

सर्वेक्षण नाहीच
साठ विद्यार्थी संख्येसाठी दोन शिक्षक व एक किलोमीटर परिसरात प्राथमिक शाळा हवी, असे शिक्षण हक्क कायदा सांगतो. मग दहा पटसंख्येच्या आतील शाळा शासन का बंद करत आहे? शिक्षणापासून एकही मूल वंचित राहायला नको असेल, तर कमी पटसंख्येचे कारण पुढे करत शाळा बंद करण्याचे षड्‌यंत्र थांबवायला पाहिजे, अशी भूमिका विविध शिक्षक संघटनांनी घेतली. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करत असताना राज्यातील वाड्यावस्त्या, पाडा, बेडा, तांडा यांचे सर्वेक्षणच केलेले नाही.

राज्यातील वाड्या-वस्त्यांवर शाळा झाल्याने विद्यार्थ्यांची दरवर्षी होणारी गळती थांबली. शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली असून, कमी पटसंख्या असलेल्या या शाळा शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांच्या शाळा आहेत, ही गोष्ट शासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर आता अंतर तपासणीच्या सूचना आल्या.अशीही पोस्ट महाराष्ट्र शासनाच्या शाळा बंद निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल मीडियावर एक पोस्ट फिरत आहे. 

जपानमध्ये कामी-शिराताकी नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे. प्रवासी कमी झाल्याने जपान रेल्वे हा संपूर्ण मार्ग बंद करणार होती, पण तेवढ्यात त्यांना समजलं, की ‘काना हाराडा’ नावाची एक लहान मुलगी या रेल्वेचा वापर रोज शाळेत जाण्यासाठी करते. त्यामुळे तिचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत रेल्वे बंद न करण्याचे जपान रेल्वेने ठरविले आणि केवळ एका प्रवाशासाठी ही रेल्वे धावली. गेल्या वर्षी तिचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच ही रेल्वे बंद झाली.

Web Title: Kolhapur News Less number of students in school issue