ग्रंथालयांसह ग्रंथपालांना उज्ज्वल भविष्य 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - "ग्रंथपाल हा शिक्षकांचा शिक्षक असतो. शैक्षणिक संस्थेत ग्रंथालयास अनन्यसाधारण महत्त्व आहे. यापुढेही ग्रंथालयांना आणि ग्रंथपालांना उज्ज्वल भविष्य आहे,' असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालय आणि माहितीशास्त्राचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. एन. आय. दिवटणकर यांनी केले. ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या 125 व्या जयंतीनिमित्ताने न्यू कॉलेजमध्ये निवृत्त ग्रंथपालांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. एन. व्ही. नलवडे अध्यक्षस्थानी होते. न्यू कॉलेज ग्रंथालय व शिवाजी विद्यापीठ महाविद्यालयीन ग्रंथपाल असोसिएशनने या उपक्रमाचे आयोजन केले होते. 

डॉ. नमिता खोत म्हणाल्या, ""महाविद्यालयीन ग्रंथपालांनी शैक्षणिक आणि सार्वजनिक ग्रंथालयांच्या प्रश्‍नाकडेही लक्ष द्यावे. संघटितपणे ग्रंथालय क्षेत्राच्या उन्नतीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.'' 

प्रा. डॉ. दिवटणकर, ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालिका डॉ. नमिता खोत, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉ. शालिनी लिहीतकर यांनी आधुनिक ग्रंथालये आणि ग्रंथपालांपुढील आव्हाने या विषयांवर व्याख्याने झाली. ज्या ग्रंथपालांनी पीएच.डी. प्राप्त केली अशा ग्रंथपालांचा सत्कार झाला. 

प्राचार्य डॉ. एन. व्ही. नलवडे म्हणाले, ""वाचकांना ग्रंथालयाकडे आकृष्ट करून ग्रंथपालांनी टी. व्ही. आणि मोबाईलकडे वळलेल्या वाचकांना पुन्हा ग्रंथालयाकडे प्रवाहात आणावे.'' प्रा. रा. रा. मासुले, प्रा. डॉ. एस. ए. एन. इनामदार यांनी मनोगत व्यक्त केले. 

संघटनेचे निमंत्रक प्रा. डॉ. आर. पी. आडाव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. बालाजी कांबळे यांनी करून दिला. प्रा. डॉ. बी. एस. पडवळ यांनी ग्रंथालय असोसिएशनचा उद्देश सांगितला. प्रा. प्रशांत कल्लोळी व प्रा. नायकवडी यांनी वेबसाईटचे प्रेझेंटेशन केले. सूत्रसंचालन प्रा. शिवाजी कांबळे व प्रा. सौ. संध्या यादव यांनी केले. आभार डॉ. पांडुरंग पाटील यांनी मानले. 

ज्येष्ठ ग्रंथपाल, पी. सी. पाटील, संभाजी मोरे, प्रा. रा. रा. मासुले, डॉ. एस. ए. एन. इनामदार, प्रा. सौ. जवळकर, प्रा. राजोबा, प्रा. शितोळे, प्रा. शेटे, अनिल पाटील यांचा सत्कार झाला. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील ग्रंथपाल उपस्थित होते. 

Web Title: kolhapur news Librarian