खासगी बसभाडे लुटीला चाप...

शिवाजी यादव
रविवार, 29 एप्रिल 2018

कोल्हापूर - सलग सुट्ट्यांच्या काळात वाढत्या प्रवाशांचा लाभ उठवत खासगी वाहतूकदारांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारत प्रवाशांची लूट होते. याला आता परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी चाप लावला. एसटीच्या भाड्याच्या दीडपट जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी वाहनधारकांचा परवाना रद्द होणार आहे, तसे आदेश राज्यभर दिले आहेत. यामुळे सुटीत प्रवाशांची होणारी लूट थांबणार आहे. 

कोल्हापूर - सलग सुट्ट्यांच्या काळात वाढत्या प्रवाशांचा लाभ उठवत खासगी वाहतूकदारांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारत प्रवाशांची लूट होते. याला आता परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी चाप लावला. एसटीच्या भाड्याच्या दीडपट जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी वाहनधारकांचा परवाना रद्द होणार आहे, तसे आदेश राज्यभर दिले आहेत. यामुळे सुटीत प्रवाशांची होणारी लूट थांबणार आहे. 

राज्यात आराम बस, ट्रॅव्हल्स आदी वाहनांतून प्रवासी होते. सुटीच्या कालावधीत खासगी वाहतूकदारांकडून अवाजवी भाडे आकारले जाते. त्यामुळे अशा वाहनांचे भाडे निश्‍चित करावे, असा आदेश उच्च न्यायालयाने एका याचिकेत दिले. त्यानुसार खासगी गाड्यांचे भाडे निश्‍चित करण्यासाठी पुण्यातील केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्ट (सीआयआरटी) या संस्थेची नियुक्‍ती केली. 

दृष्टिक्षेपात खासगी बस वाहतूक...

 •  राज्यात एकूण खासगी बस संख्या : ३८ हजार 
 •  दिवसाला दीड लाख ते एक लाख प्रवाशांची वाहतूक 
 •  दिवसाची उलाढाल एक ते दीड कोटी रुपये
   

या संस्थेने खासगी वाहतुकीचा अभ्यास करून शासनाला अहवाल सादर केला. यात खासगी आराम गाड्या एसी, नॉन एसी, स्लिपर कोच, सेमी स्लिपर आदी गाड्यांचा अभ्यास केला. 

परिवहनमंत्र्यांच्या आदेशाविषयी संभ्रमावस्था आहे. एसटीच्या किलोमीटरप्रमाणे भाडे व खासगी बसचे किलो मीटरप्रमाणे भाडे हे दोन्ही विषय स्वतंत्र आहेत. लवकरच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन देणार.  
- सतीशचंद्र कांबळे,
अध्यक्ष खासगी बस वाहतूक संघटना.

खासगी भाडे आकारणीच्या अनुषंगाने जो आदेश निघाला, त्याबाबत एसटीकडून सूचना येतील, तशी अंमलबजावणी करू, एसटी महामंडळ सुटीच्या काळात जादा गाड्यांची व्यवस्था करते, त्याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा.
-राहुल पलंगे,
एसटी विभाग नियंत्रक

या गाड्यांना एसटी महामंडळाच्या भाड्याच्या तुलनेत दीडपट जास्त भाडे घेता येईल. एसटीचे वाहतुकीचे भाडे राज्य परिवहन प्राधिकारणाकडून निश्‍चित केलेले आहे, त्यानुसार एसटीचे भाडे विचारात घेऊन प्रतिकिमी भाडे दरापेक्षा ५० टक्के पेक्षा (दीडपट) पेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडे निश्‍चितची नोंद संस्थांनी केली आहे. या निर्णयानुसार खासगी वाहनांकडून तिकीट भाडे आकारणे बंधनकारक राहणार आहे. सलग चार दिवस सुट्या असल्याने खासगी वाहतूकदारांकडून रात्रीच्या प्रवासाचे भाडे दामदुप्पट घेतले जाते, जिथे पाचशे रुपये भाडे आहे, तेथे दोन हजार तिकीट भाडे आकारले जाते, अशा मनमानीला आवर घालता येणार आहे. 

सुटीत गर्दीवेळी अशी होते भाडे आकारणी 

 •  मुंबई-पुणे-पणजी, नियमित भाडे ८०० रुपये (वाढीव १५००)
 •  मुंबई- रत्नागिरी- पणजी नियमित भाडे ७०० (वाढीव १५००) 
 •  कोल्हापूर- पुणे- मुंबई, नियमित भाडे ७०० ते ८०० (वाढीव १५००) 
 •  सोलापूर-पुणे, नियमित भाडे ४०० (वाढीव ८००)
 •  पुणे- नाशिक,  नियमित भाडे ५०० (वाढीव १००० ते १२००) 
 •  नांदेड- नागपूर नियमित भाडे ७०० (वाढीव १४००)
 •  औरंगाबाद- पुणे नियमित भाडे ७००( वाढीव १४००)  
Web Title: Kolhapur News limitation on private bus rent