डी. वाय. कारखान्याचा अहवाल देणाऱ्यास ११ हजारांचे बक्षीस - महाडिक

डी. वाय. कारखान्याचा अहवाल देणाऱ्यास ११ हजारांचे बक्षीस - महाडिक

कोल्हापूर -  डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याचा अहवाल देणाऱ्यास अकरा हजारांचे बक्षीस माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आज जाहीर केले. आपण रडीचा डाव खेळत नाही, ज्यांची स्वतःची घरे काचेची आहेत त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारायचे नसतात, असा टोलाही त्यांनी आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता लगावला.

कारखान्याच्या सभेनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, विरोधकांकडे मुद्देच नसल्याने त्यांनी सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. सभा उधळण्याचा त्यांचा प्रयत्न फोल ठरला. कारखान्यावर टीका करणाऱ्यांनी स्वतःच्या कारखान्याकडेही पाहावे.

‘डी. वाय’ कारखान्याच्या अहवालासंबंधी त्यांचे सहा संचालक तसेच सह निबंधकांना अहवालासंबंधी फोन लावला. मात्र, एकानेही अहवाल मिळाला नसल्याचे सांगितले. 
को-जेनरेशन नसताना आमचा दर अधिक आहे. को-जनरेशनसाठी दोन हजार मेगावॅट वीज प्रकल्पाची शासनाची अट होती. त्यासाठी अकरा साखर कारखान्यांनी करार केला. अडीच हजार मेगावॉटपर्यंत क्षमता वाढल्यास आमच्या इथेही प्रकल्प सुरू होऊ शकतो. त्याचा खर्च ऊस उत्पादकांवर पडू नये, यासाठी शासनाने वीज खरेदी करावी, अशी मागणी आहे. 

पावसाअभावी चाळीस टक्के ऊस उत्पादन घटल्याचे सांगून ते म्हणाले, ‘‘कसबा बावड्यातील ऊस कोणत्याही स्थितीत जानेवारीअखेर संपवला जाईल. संचालक व आमदार अमल महाडिक यांनी कारखान्यावर कर्ज नाही. सभासदांची एकही ठेव नाही. विरोधकांच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे देण्याची तयारी आम्ही ठेवली होती’’, असेही त्यांनी सांगितले.

‘डी. वाय.’चे ४ हजार सभासद कुठे गेले?
श्री. महाडिक म्हणाले, डी. वाय.कारखान्याने २८७४ रुपये दर दिला. आम्ही २९५० इतका दर दिला. २२६ रुपयांनी आमचा दर अधिक आहे. डी. वाय कारखान्याचे ६५६३ इतके सभासद होते. आज हीच संख्या २२१२ वर आली आहे. पाच हजार सभासद गेले कुठे? एका गावात तर सातबारा खोटा, तलाठी खोटा आणि सर्कलही खोटा असल्याचे स्पष्ट झाले. 

हिंमत असेल तर मला प्रश्‍न विचारा
श्री. महाडिक म्‍हणाले, शशिकांत खवरे यांच्या नावाने दुसऱ्यानेच प्रश्‍न विचारले. सही तज्ज्ञांतर्फे आम्ही माहिती घेतली, त्या वेळी त्या सह्या एकाच व्यक्तीच्या अर्थात सालपे यांच्या असल्याचे पुढे आले. दीड दमडीचा वकील, पी. जी. मेढे यांच्यासारख्या तज्ज्ञाला प्रश्‍न विचारण्‍याचे धाडस करतो. हिंमत असेल त्याने मला प्रश्‍न विचारावेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com