महादेवराव महाडिक गोकुळचे लुटारूः सतेज पाटील

सुनील पाटील
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

कोल्हापूर: माजी आमदार महादेवराव महाडिक हे जिल्हा सहकारी दूध (गोकुळ) संघाचे लुटारू आहेत. त्यांच्याच हातात माईक दिल्याने सभासदांच्या प्रश्‍नांची उत्तर न देताच गोकुळची 55 वी वार्षिक सभा गुंडाळली. मात्र, गोकुळ म्हणजे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची खासगी प्रॉपर्टी नाही, त्यामुळे महाडिक यांनी अधिकार नसताना आणि बेकायदेशीरपणे ठराव वाचन व मंजूर करून घेतल्याच्या निषेधार्थ उद्या सहाय्यक निबंधक (दूग्ध) निवेदन देवून ही सभा नव्याने घ्यावी व संचालक मंडळावर कारवाई करावी, अशी मागणी करणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी आज (सोमवार) दिली.

आमदार श्री. पाटील म्हणाले, गोकुळच्या ताराबाईपार्क येथे शुक्रवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनीच विषयांचे वाचन करण्याऐवजी तुम्हाला अहवाल मिळाला का? अहवालातील 1 ते 11 विषय मंजूर आहेत का असे म्हणून बेकायदेशीररित्या ठराव मंजूर करून घेतले आहेत. ठराव वाचन करण्याचा कायदेशीर अधिकारी सचिवांना आहे. मात्र, तो अधिकार स्वत:कडे घेवून ही सभा बेकायदेशीररित्या घेवून सभासदांच्या प्रश्‍नांची उत्तर देण्याआधीच सभा गुंडाळून सभासदांच्याहिताला हरताळ फासला आहे. महाडिक हे गोकुळचे लुटारू आहेत. आतापर्यंत ते गोकुळला लुटत राहिले. गेल्यावर्षी आपण त्याचा हिशोब मागितला. रडत-कडत त्यांनी उत्तरे दिली. अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी गेल्यावर्षी जे काही प्रश्‍न असतील ते लेखी आणि वेळेत देण्याच्या सूचना केल्या होत्या. यावर्षी 34 प्रश्‍न लेखी आणि वेळेत दिले होते. मात्र त्या एकाही प्रश्‍नाचे उत्तर त्यांनी दिले नाही. जर त्यांचा कारभार चोख आणि पारदर्शी होता मग सभा गुंडाळली का? असा सवालही केला. वास्तविक ज्यांनी गोकुळ लुटला त्या महाडिक यांच्याच हाती माईक दिल्याने उत्तर देण्याऐवजी सभा गुंडाळण्याची नामुष्कि आली. मात्र, महाडिक यांनी वाचलेले आणि मंजूर करून घेतलेले ठराव बेकायदेशीर आहे. वास्तविक गोकुळची वार्षिक सभा घेताना सहाय्यक निबंधक हजर असायला पाहिजे होते. त्यांनी सभेचा सर्व वृत्तांत आपल्याकडे ठेवला पाहिजे होता. याचाही जाब उद्या विचारला जाणार आहे.'

यावेळी माजी आमदार संपतराव पवार-पाटील, मारूती जाधव, बाळासाहेब कुपेकर, बाबासाहेब देवकर, करणसिंह गायकवाड उपस्थित होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: kolhapur news Mahadevrao Mahadik Gokul's robbery: Satej Patil