महालक्ष्मी मंदिरात आर्द्रतेसाठी स्वच्छता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

कोल्हापूर - महालक्ष्मी मंदिरात आज पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि करवीर निवासिनी महालक्ष्मी श्रीपूजक भक्त मंडळ यांनी संयुक्तपणे एक वेगळी स्वच्छता मोहीम राबविली. 

कोल्हापूर - महालक्ष्मी मंदिरात आज पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि करवीर निवासिनी महालक्ष्मी श्रीपूजक भक्त मंडळ यांनी संयुक्तपणे एक वेगळी स्वच्छता मोहीम राबविली. 

महालक्ष्मी मूर्तीच्या आर्द्रता नियंत्रणासाठी मातृलिंग येथील प्रदक्षिणा मार्गावर वायुविजन पद्धती खुली करण्यासाठी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी सात वाजता ही मोहीम सुरू करण्यात आली. त्यामध्ये प्रदक्षिणा मार्गावर लावलेला चुना काढण्याचे काम करण्यात आले. सुमारे ८ ते ९ पोती चुना काढण्यात आला. या मोहिमेत देवस्थान समिती सदस्य शिवाजीराव जाधव, संगीता खाडे, सचिव विजय पोवार, सहसचिव शिवाजी साळवी, सुदेश देशपांडे, सुयश पाटील, मिलिंद घेवारी, महादेव दिंडे, मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव, श्रीपूजक मंडळाचे अजित ठाणेकर, माधव मुनीश्‍वर, ॲड. केदार मुनीश्‍वर, मंदार मुनीश्‍वर, ऐश्‍वर्या मुनीश्‍वर, चेतन चौधरी, मनीष लाटकर, स्वरूप चरणकर, अनिरुद्ध चरणकर, निरंजन सांगवडेकर, प्रफुल्ल बोंद्रे, रवींद्र गोसावी, मुकुंद कुलकर्णी यांनी सहभाग घेतला.

Web Title: kolhapur news mahalaxmi temple