‘भारत नेट’मध्ये महाराष्ट्र राज्य देशात उत्कृष्ट

‘भारत नेट’मध्ये महाराष्ट्र राज्य देशात उत्कृष्ट

कोल्हापूर - देशातील १ लाखांहून अधिक ग्रामपंचायती ‘भारत नेट’च्या पहिल्या टप्प्यात हायस्पीड ब्रॉडबॅंडद्वारे जोडल्या आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र हे ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ ठरले. राज्यातील १२ हजारांहून अधिक ग्रामपंचायती इंटरनेटद्वारे जोडल्या आहेत. देशात ३१ डिसेंबर २०१७ अखेर २ लाख ५४ हजार ८९५ किलोमीटर ऑप्टिकल फायबरचे जाळे निर्माण केले असून, याद्वारे हायस्पीड ब्रॉडबॅंड सेवेने देशातील १ लाख १ हजार ३७० ग्रामपंचायतींना ‘भारत नेट’च्या पहिल्या टप्प्यात हायस्पीड ब्रॉडबॅंड इंटरनेट सेवेने जोडले.

‘भारत नेट’ या नावाने हा उपक्रम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील ग्रामपंचायतींना हायस्पीड ब्रॉडबॅंडद्वारे जोडलेल्या कामाबद्दल महाराष्ट्र उत्कृष्ट राज्य ठरले. महाराष्ट्रातील १२ हजार ३७८ ग्रामपंचायतींत इंटरनेट सेवा उपलब्ध झाली, तर १४ हजार ८७८ ग्रामपंचायतींत ‘भारत नेट’च्या कामास सुरुवात झाली. महाराष्ट्राबरोबर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि झारखंड ही राज्येसुद्धा ‘भारत नेट’च्या पहिल्या टप्प्यात आघाडीवर आहेत. 

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘भारत नेट’ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभाग आघाडीवर आहे. भारत नेट प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील ११  जिल्ह्यांत एकूण ३ हजार ६०४, मराठवाड्यात ३२००, खानदेशात १७५५, पश्‍चिम महाराष्ट्रात २४२१, तर कोकण विभागात १३६५ ग्रामपंचायतींत इंटरनेट सेवा उपलब्ध आहे. 

जिल्हानिहाय इंटरनेट कनेक्‍ट ग्रामपंचायती

  •  विदर्भ विभाग - नागपूर - ७६०, गोंदिया - ५१३, भंडारा - ४५९, अमरावती - ३२७, चंद्रपूर - ३१५, वर्धा - २७०, बुलढाणा - २६८, गडचिरोली - २०५, यवतमाळ - २०३, अकोला - १४३, वाशिम - १४१.
  •  मराठवाडा विभाग - बीड - ८०७, उस्मानाबाद - ६०९, जालना - ४८०, लातूर - ३३५, नांदेड - ३१८, औरंगाबाद - २९४, परभणी - २४७, हिंगोली - ११०.
  •  खानदेश विभाग - नाशिक - ४६३, जळगाव - ३९९, धुळे - ३६७, नंदूरबार - ३१७, अहमदनगर - २०९.
  •  पश्‍चिम महाराष्ट्र - पुणे - ६९८, सांगली - ५१७, कोल्हापूर - ५०४, सातारा - ४३३, सोलापूर - २६९.
  •  कोकण - रायगड - ७३१, सिंधुदुर्ग - २६०, रत्नागिरी - २२२, पालघर - ९३, ठाणे - ५९.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com