महात्मा फुलेंचे समग्र वाङ्मय नव्या रूपात 

डाॅ. प्रमोद फरांदे
बुधवार, 4 एप्रिल 2018

कोल्हापूर - सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतिराव फुले यांचे गेली अनेक वर्षे उपलब्ध होत नसलेले महात्मा फुले समग्र वाड्‌मय नव्या रूपात प्रकाशित होत आहे. या सुधारित आवृत्तीमध्ये सामाजिक दुष्ट्या महत्वपूर्ण आणि दुर्लक्षित राहिलेले सुमारे 200 पानांचे साहित्याचा समावेश करण्यात आला आहे.

कोल्हापूर - सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतिराव फुले यांचे गेली अनेक वर्षे उपलब्ध होत नसलेले महात्मा फुले समग्र वाङ्मय नव्या रूपात प्रकाशित होत आहे. या सुधारित आवृत्तीमध्ये सामाजिक दुष्ट्या महत्वपूर्ण आणि दुर्लक्षित राहिलेले सुमारे 200 पानांचे साहित्याचा समावेश करण्यात आला आहे.

महात्मा फुलेंचे दुर्लक्षित पैलू संशोधक, अभ्यासक, पुरोगामी विचारवंत, वाचकांसमोर येणार आहेत. यामध्ये महात्मा फुलेंची सामाजिक पत्रकारिता, त्यांनी गर्व्हनर म्हणून केलेले काम, महाराजाचा सयाजीराव गायकवाड यांच्याशी केलेला पत्रव्यवहार, यशवंतराव फुले लिखित आद्य फुले चरित्र, सत्यशोधक चळवळीतील ऐतिहासिक दस्तऐवज अशा अनेक बाबींची समावेश आहे. 

महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समितीतर्फे ही सुधारित आवृतीचे 11 एप्रिलला प्रकाशन होत आहेत. प्रा. हरि नरके यांनी त्यांचे संपादन केले असून पहिल्या आवृत्तीपासून गेली 30 वर्षे ते या ग्रंथाशी संबंधित आहेत. 2006 पासून समग्र वाङ्मयाचे प्रकाशन झाले नसल्याने वाचक, अभ्यासक, संशोधकांना ते उपलब्ध होत नव्हते. श्री. नरके यांच्या प्रयत्नामुळे सामाजिकदुष्या महत्वपूर्ण, दुर्लक्षित पैलू व ऐतिहासिक दस्तऐवजाचा या सुधारित आवृत्तीमध्ये समावेश झाला आहे.

1969 साली महात्मा फुले यांच्या समग्र साहित्याचे प्रथम प्रकाशन झाले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे धनंजय कीर- स. गं. मालशे यांनी त्याचे संपादन केले होते. गेल्या 50 वर्षात यांच्या लाखो प्रती विकल्या गेल्या. 1991 मध्ये फुले स्मृतीशताब्धीवर्षानिमित्त डॉ. य. दि. फडके संपादित आवृत्ती काढण्यात आली होती. त्यावेळी हे पुस्तक विकत घेण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या. 2006 साली निघालेली आवृत्तीही होतोहात खपली होती.

महात्मा फुलेंचे विचार हे दिशादर्शक, प्रेणादायी असल्याने त्यांच्या साहित्याला नेहमीची मोठी मागणी असते. आजअखेर या अडीच लाखाहून अधिक प्रती खपल्या गेल्याचे प्रकाशन समितीकडून सांगण्यात येते. 11 एप्रिलला महात्मा फुलेंच्या 191 व्या जयंतीदिनी सुधारित आवृत्तीचे प्रकाश होणार असून प्रकाशनापासून ते वाचकांना उपलब्ध होणार आहे. एप्रिल अखेर ते राज्यातील मुंबई, कोल्हापूर, पुणे, नागपूर यासह सर्व शासकीय ग्रंथ भांडारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. 

महात्मा फुले समग्र वाड्‌मयाचे इंग्रजी, हिंदी, कन्नड, तेलगू, तामिळ, बंगाली, उर्दू, गुजराती आदी 13 भांषामध्ये अनुवाद प्रकाशित झाला आहे. आणखी 9 भाषांमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे.  

- प्रा. हरि नरके, सदस्य सचिव, महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समिती. 

Web Title: Kolhapur News Mahatma Phule literature in new form