‘केएसए’च्या अध्यक्षपदी मालोजीराजे यांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

कोल्हापूर - कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशनच्या (केएसए) अध्यक्षपदी मालोजीराजे छत्रपती यांची नियुक्ती करण्यात आली. ते केएसएचे बारावे अध्यक्ष म्हणून काम पाहतील. केएसएचे चिफ पेट्रन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी त्यांची नियुक्ती केली. सरदार मोमीन यांनी अध्यक्षपदाचा राजीमाना दिल्याने हे पद रिक्त होते. 

श्री. मोमीन यांच्याकडे २०१५ पासून अध्यक्षपदाचा कार्यभार होता. चार-पाच दिवसांपूर्वी त्यांनी शाहू महाराज यांच्याकडे राजीनामा दिला. आज अचानक सरचिटणीस माणिक मंडलिक यांनी मालोजीराजे यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे सांगितले.

मालोजीराजे यांची राज्य शालेय फुटबॉल संघात निवड झाली होती. कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल, कोल्हापूर जिल्हा टेबल टेनिस, वेस्टर्न महाराष्ट्र बॅडमिंटन, कोल्हापूर जिल्हा रग्बी असोसिएशनचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. या कारकीर्दीत त्यांनी खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे भारत विरुद्ध हॉलंड यांच्यातील आंतरराष्ट्रीय महिला सामन्यासह आय लीग, ओएनजीसी द्वितीय श्रेणी साखळी, राष्ट्रीय महिला साखळी स्पर्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून ते सध्या काम पाहत आहेत.

Web Title: Kolhapur News Malojiraje as KSA president