चले जाव, चले जाव, राजू शेट्टी चलेजाव

अतुल मंडपे
रविवार, 29 जुलै 2018

हातकणंगले - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी हातकणंगले तहसिल कार्यालयासमोर मराठा समाजाच्यावतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी खासदार राजू शेट्टी आंदोलनस्थळी गेले होते. पण यांना संतप्त आंदोलकांनी अक्षरश: हाकलून लावले.

हातकणंगले - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी हातकणंगले तहसिल कार्यालयासमोर मराठा समाजाच्यावतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी खासदार राजू शेट्टी आंदोलनस्थळी गेले होते. पण यांना संतप्त आंदोलकांनी अक्षरश: हाकलून लावले.

आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी करत खासदार शेट्टी यांना आंदोलनस्थळी फिरकूही दिले नाही. चले जाव, चले जाव, राजू शेट्टी चलेजावच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी हातकणंगले तहसिल कार्यालयासमोर मराठा समाजाच्यावतीने गेले सहा दिवस ठिय्या आंदोलन सुरू आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारत आमदार, खासदारांनी राजीनामे द्यावेत यासाठी उद्या शंखध्वनी करत त्यांच्या घरावर मोर्चाही काढण्यात येणार आहे.

दरम्यान एका कार्यक्रमासाठी खासदार राजू शेट्टी आज हातकणंगलेत आले होते. जाता जाता आंदोलकांना भेटून पाठिंबा देण्यासाठी ते तहसिल कार्यालयासमोर गेले. मात्र त्यांचे तिथे आगमन होताच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शंखध्वनी करण्यास सुरवात केली. राजू शेट्टी गो बॅक, राजू शेट्टी चलेजाव च्या घोषणा देत शंखध्वनी करण्यात आला.

आम्हाला तुमची सहानभूमी नको आहे जाता, जाता भेट द्यायचे नाटक कशाला करता, आमचे प्रश्‍न मांडण्यासाठी तुम्हाला निवडून दिले आहे. पाठिंबाच द्यायचा असेल तर राजीनामा द्या अन्यथा इकडे फिरकू नका म्हणत आंदोलकांनी त्यांना अक्षरश: पिटाळून लावले. यावेळी त्यांच्या सोबत आलेल्या पुढाऱ्यांचेही यावेळी भंबेरी उडाली.

Web Title: Kolhapur News maratha reservation agitation Maratha Kranti Morcha