इचलकरंजी - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज शहरात छत्रपती शिवाजी पुतळा चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. मराठ्यांचे वादळ निर्माण झाले. "मराठा आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे" अशी गर्जना करीत सकल मराठा समाज चौकात एकवटला होता.
त्यानंतर प्रांत कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढून प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन देण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी राज्यभरात यापूर्वी मराठा मुक मोर्चा निघाले होते. मात्र अद्याप मागण्यांबाबत शासन पातळीवर उदासिनता दिसत आहे. त्यामुळे पून्हा एकदा राज्यभरात मराठा ठोक मोर्चा निघत आहे. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी शहरात आज मराठा सोशल ग्रुप व अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजातर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. हातात विविध घोषणांचे फलक घेवून समाज बांधव व भगिनी सहभागी झाल्या होत्या.
डोक्यावर भगवी टोपी व खांद्यावर स्कार्प घेवून समाजातील तरुणाई आपल्या हक्कासाठी आज पून्हा एकदा रस्त्यावर उतरली. तसेच महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या आंदोलनामुळे चौकात येणारी सर्व वाहतूक ठप्प झाली.
शासनाच्या विरोधात हल्लाबोल करीत तेथून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मलाबादे चौकातून मोर्चा प्रांत कार्यालयावर आला.
प्रवेशव्दारासमोर मोर्चा पोलिसांनी रोखला. त्यानंतर शिष्टमंडळांने प्रांताधिकारी समीर शिंगटे यांची भेट घेवून भावना मांडल्या. यावेळी शहाजी भोसले यांनी निवेदनाचे वाचन केले. त्यानंतर निवेदन स्वीकारण्यासाठी मोर्चासमोर येण्याची विनंती प्रांताधिकारी शिंगटे यांना कण्यात आली. त्यानंतर प्रवेशव्दाराजवळ श्री.शिंगटे यांनी शिष्टमंडळाकडून मागण्यांचे निवेदन घेवून शासनाकडे आंदोलकांच्या भावना कळविण्याचे आश्वासन दिले.
आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री प्रकाश आवाडे, मदन कारंडे, प्रकाश मोरबाळे, प्रकाश मोरे, अजितमामा जाधव, संतोष सावंत, अरविंद माने, नितीन पाटील, अमरजीत जाधव, उदयसिंग पाटील, रवि शिंदे, मेघा चाळके, उर्मिला गायकवाड, माधुरी चव्हाण, अनिल केसरकर, दिपक रावळ, उत्तम विभुते, शिवाजी पाटील, नितीन कोकणे, अमृता भोसले, सलोनी शिंत्रे, ज्योती माने, संजय जाधव, ऋषीकेश मुसळे, सुनिल शेलार, विजय रवंदे, किरण पोवार, शेखर हळदकर, संजय शिंदे, अवधूत मुडशिंगकर यांनी केले.
गाजराची प्रतिकृती लक्षवेधी
आंदोलनामध्ये गाजराची प्रतिकृती करण्यात आली होती. शासनाने आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याचे गाजर दाखविल्याचा त्यातून संदेश देण्यात आला. त्यामुळे गाजराची प्रतिकृती लक्षवेधी ठरली. या शिवाय विविध घोषवाक्याचे फलक लक्षवेधून घेतले होते.
आमदारांनी राजीनामा द्यावा
मराठा आरक्षण मिळाले नाही तर आमदारकीचा राजीरामा देतो, असे आमदार सुरेश हाळवणकर यांनी घोषणा केली होती. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा देवून आमच्या लढ्यात त्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आंदोलनावेळी करण्यात आले.
निवेदनातील मागण्या...
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.